मुळशीत घरात शिरला भला मोठा साप, आजीनं दाखवला धमाका

Fearless Grandmother Catches Snake: मुळशी तालुक्यातल्या सुतारवाडीत मुसळधार पावसात घरात शिरलेल्या सापाला एका आजीनं धाडसानं पकडलं. सगळे घाबरले, पण आजी न घाबरता सापाला गळ्यात घालून जंगलात सोडून आली.
Brave grandmother from Sutarwadi, Mulshi, holds a snake that entered her house during heavy rainfall.
Brave grandmother from Sutarwadi, Mulshi, holds a snake that entered her house during heavy rainfall.Saam Tv
Published On

मुसळधार पाऊस सुरू आहे. बाहेरचे प्राणी घरात आल्याच्या अनेक घटना समोर येतायेत. असाच एक प्रकार मुळशीत घडलाय. घरामध्ये भला मोठा साप शिरला. मात्र जराही न घाबरता घरातल्या आजीने या सापाचा कसा करेक्ट कार्यक्रम केला पाहूयायय.

पावसानं नुसता दणका उडवलाय. नद्यांना पूर आला. शेत पाण्याखाली गेली. बाहेरचं लांबडं घरात शिरलं. अहो लांबडं म्हणजे साप. लेकरं बाळ घाबरली. जिकडे तिकडे पळत सुटली.

घरातल्या आजीला कळलं घरात शिरलाय साप. व्हायचा डोक्याला ताप. मग आजीचं खोचला पदर... दाखवला सापाला इंगा. साप बसला होता पत्र्या मागं... आजीनं हळूच केला पत्रा बाजूला सापाला. तरणी बांडगाडी भितीच्या आडन बघत होती... पण डेरिंग कुणाच्यात नाय...

आजीनं काचदिशी धरलं सापाला.. अन् आली म्होरं... सापाला थेट आजीनं गळ्याभोवती गुंडाळल्या. नातू म्हणत होतं असं नकू करु.. पण आजी ऐकतीय कुठं? घटना मुळशी तालुक्यातल्या सुतारवाडीतली हाय..

आजीनं सापाचा करेक्ट कार्यक्रम केला. सापाला जंगलात सोडलं. पण आजीचं बघून तुम्ही तसं करण्याच्या फांद्यात पडू नका. पहिलं सर्प मित्राला बोलवायचं.. नाहीतर व्हायची मोठी गडबड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com