बीडमध्ये राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर...!

MPSC विद्यार्थ्यांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केलीय.
बीडमध्ये राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर...!
बीडमध्ये राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर...!विनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड - MPSC कडून मुलाखत घेण्यासाठी विलंब होत असल्याच्या तणावातून, स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केलीय. यामुळं बीडमध्ये एमपीएससीचे विद्यार्थी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले आहेत. MPSC students on the streets in Beed shouting slogans against the state government ...!

हे देखील पहा -

शेतकरी वडिलांकडून रक्ताचं पाणी करून कमावलेल्या पैशातून आपल्या मुलाला शिकवलं जातंय. आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं एमपीएससी करण्यासाठी शहरात येतात. या ठिकाणी दिवसरात्र मेहनत करून, परीक्षेची तयारी करतात. मात्र परीक्षा पास होऊन देखील, राज्य शासनाच्या बेजबाबदार पणामुळं एमपीएससीच्या पहिल्या दोन परीक्षा पास होऊन देखील त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यास विलंब केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण पसरले आहे. आणि याच नैराश्यातून स्वप्नील या तरुणाने आत्महत्या केलीय.

बीडमध्ये राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर...!
#MpscSwapnilLonkar सरकारनी आमच्या भावाचा खून केला

त्यामुळं या राज्य शासनाने आतातरी MPSC विद्यार्थ्यांविषयी सकारात्मक भूमिका घेऊन, मुलाखती घ्याव्यात. अन्यथा शेतकरी आत्महत्या प्रमाणे MPSC चे विद्यार्थी देखील आत्महत्या करतील. आणि यामुळं महाराष्ट्रच्या संस्कृतीला काळिमा फासेल. त्यामुळं तात्काळ MPSC विद्यार्थ्यांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com