MPSC PSI Exam : पोलीस उपनिरीक्षक विभागीय परीक्षेत बदल, आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर

MPSC PSI Exam Timetable : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार होती. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ शनिवार दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्याचे नियोजित होते.
MPSC PSI Exam
MPSC PSI ExamSaam Tv
Published On

MPSC PSI Exam Date Change :

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदांची परीक्षा लवकरच घेण्यात येणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ शनिवार दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्याचे नियोजित होते.

परंतु, प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सुधारित दिनांकास म्हणजेच रविवारी दिनांक १० डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात येईल. याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपसचिवांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगावर खाकी असावी यासाठी लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची (Exam) तयारी करत असतात. आपणही पोलिस (police) होऊन तो मान मिळवावा असे अनेकांना वाचते. महाराष्ट्रात तर पीएसआय पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते. परंतु, या परीक्षेत बदल झाल्यामुळे अनेक उमेदवारांना अभ्यासासाठी अधिक वेळ (Time) मिळणार आहे.

MPSC PSI Exam
OFDC Recruitment 2023 : बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; हजारो रिक्त जागा, वाचा सविस्तर माहिती

जर तुम्ही देखील ही स्पर्धा पूर्व परीक्षा देत असाल तर या सूचना लक्षात ठेवा

  • परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

  • परीक्षा सुरु होण्यापूर्वी दीड तासआधी केंद्रावर हजर राहाणे अनिवार्य आहे.

  • तसेच स्वत:चे ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र

  • परीक्षा कक्षात मोबाईल अथवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही.

  • परीक्षा कक्षेत कोणतेही गैरवर्तन करण्याचा प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com