MPSC Mains Result 2023: मोठी बातमी! MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, कसा आणि कुठे पाहाल?

MPSC State Services Mains Written Exam Result Published: एमपीएससी मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झालाय. तुम्हाला तो अधिकृत संकेतस्थळावर जाणून पाहता येणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ लेखी परीक्षेचा निकाल
MPSC Mains Result 2023Saam Tv
Published On

मुंबई: एमपीएससी मुख्य परिक्षेच्या निकालाची प्रतिक्षा आता संपलीय. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ लेखी परीक्षेचा निकाल आज आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलाय. यासंदर्भात महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशनच्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट करून माहिती देण्यात आलीय. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ लेखी परीक्षेचा निकाल तुम्हाला निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२३ ची लेखी परीक्षा २०, २१ आणि २२ जानेवारी २०२४ घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत, असं आयोगाने सांगितलं आहे. तर मुलाखतीबाबत माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल, असं आयोगाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलंय.

आयोगाकडून विशेष सूचना

या निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीस बोलाविण्यात येणार आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आली किंवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीच्या वेळी केली नाही. तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना किंवा अन्य कारणामुळे जर उमेदवार अपात्र ठरला तर, संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल असं आयोगाकडून सांगण्यात आलंय.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ लेखी परीक्षेचा निकाल
MPSC Prelims Exam 2024 Date: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तारीख बदलली, वाचा सविस्तर

पात्र उमेदवारांसाठी मुलाखत कार्यक्रम

लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत कार्यक्रम देखील स्वतंत्रपणे प्रसिध्द केला जाणार आहे. परीक्षेच्या निकालामध्ये जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले, त्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी देखील मुलाखतीच्या टप्प्यावर आयोगाकडून करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची तारीख आणि ठिकाण स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ लेखी परीक्षेचा निकाल
MPSC VIDEO: लिपिक टंकलेखक पदासाठी घेण्यात येणाऱ्या कौशल्य चाचणी मध्ये तांत्रिक अडचणी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com