Imtiaz Jaleel: आप भाजपची बी टीम, त्यांच्या डोक्यात शेण भरलंय; जलील यांचा केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल

Imtiaz Jaleel Vs Arvind Kejriwal News: गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रमाणे आपकडूनहू हिंदुत्व कार्ड खेळलं जातयं का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
Imtiaz Jaleel Vs Arvind Kejriwal News
Imtiaz Jaleel Vs Arvind Kejriwal NewsSaam TV
Published On

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Imtiaz Jaleel Vs Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मी देवीचाही फोटो असावा अशी मागणी केली होती. केजरीवालांच्या (Arvind Kejriwal) या मागणीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रमाणे आपकडूनहू हिंदुत्व कार्ड खेळलं जातयं का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. या चर्चां सुरू असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केजरीवाल यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. (Imtiaz Jaleel Latest News)

Imtiaz Jaleel Vs Arvind Kejriwal News
Deepali Sayed: ना उद्धव ठाकरे, ना एकनाथ शिंदे, दिपाली सय्यद नेमक्या कुणाकडून? रांगोळीतून दिले संकेत

आरएसएसने अरविंद केजरीवाल यांना उभं केलं: जलील

औरंगाबाद जिल्ह्यातील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हे आरएसएसने प्लांट केलेली भाजपची बी टीम आहे असा गंभीर आरोप थेट केला आहे. जलील म्हणाले, नरेंद्र मोदींचा ग्राफ खाली येईल तेव्हा आपला दुसरा माणूस पाहिजे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना उभं केलं आहे. गुजरात निवडणूका आणि दिल्ली निवडणूकांसंदर्भात जी मागणी त्यांनी केली आहे, हे हिंदुत्व आयडोलॉजी घेणार होते हे आम्हाला माहीत होतं. आता कुठं गेलं रस्ता, पाणी, शिक्षण? हे आत्ता यांनी सोडलं आहे असं जलील म्हणाले.

केजरीवाल यांना सरड्याची उपमा

जलील पुढे म्हणाले की, लोकांना भावनिक मुद्द्यांत अडकवण्याचा प्रयत्न होतोय. ज्या पद्धतीने ते मागणी करत आहेत यावरून यांच्या (केजरीवाल) डोक्यात शेण भरल्याचं समजतंय अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. तसेच देवी-देवतांना मनात ठेवा असा सल्ला जलील यांनी दिला आहे. यावेळी ते म्हणाले, हा भारतीय जनता पक्षाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न आहे. हे सर्वसामान्य लोकांना समजत आहे. हिंदुत्वाच्या लढाईत सगळ्यांनी उडी घेतली आहे असं जलील म्हणाले. जलील यांनी केजरीवाल यांना सरड्याची उपमा दिली, ते म्हणाले हा सरडा आहे कधी ना कधी रंग बदलणार असा हल्लाबोल त्यांनी केजरीवालांवर केला.

Imtiaz Jaleel Vs Arvind Kejriwal News
भारतीय चलनावर गौतम बुद्धांचा फोटो लावा; RPI ची थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुस्लीम महिला देशाच्या नागरिक नाहीत का?

हिजाब परिधान केलेल्या महिलांना संधी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी विचारला. ते म्हणाले, यात काय वाईट आहे? या देशातल्या मुस्लीम महिला देशाच्या नागरिक नाहीत का? त्यांना हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे मोदी देवाचे अवतार या उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांचं वक्तव्याबाबत जलील यांना विचारलं असता जलील पुन्हा म्हणाले, या मंत्र्याच्या डोक्यात शेण भरलं आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपसह भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com