सोलापूर : जिल्ह्यात कुरुल Kurul- पंढरपूर Pandharpur रस्त्याच्या road दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी उजनी Ujani बचाव संघर्ष समितीने कुरुल ग्रामस्थांसोबत चौकामधील खड्ड्यात रक्तदान शिबीर Blood donation camp घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांचा मुखवटा लावून आणि फित कापून यांचे उदघाटन Inauguration यावेळी करण्यात आले आहे.
हे देखील पहा-
या शिबिरात ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. कुरुल- पंढरपूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे भीषण अपघात होत आहेत. यात अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. तर अनेकजण जखमी देखील झाले आहेत. अनेकदा निवेदन देऊन देखील सुद्धा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या रस्त्याची दुरुस्ती करण्यास तयार होत नाहीत.
असा आरोप कुरुल ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. मागच्या ३० वर्षांपासून कुरुल- पंढरपूर रस्त्याची ही दुरावस्था आहे. जिल्ह्यामधील सर्व प्रमुख महामार्गांचे दुहेरीकरण आणि चौपदरीकरण झालेले आहे. दरम्यान, सध्या रक्तदान आंदोलन करून गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. मात्र,रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कुरुल ग्रामस्थ आणि उजनी बचाव संघर्ष समितीने दिलेला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.