हृदय पिळवटणारी घटना! अखेरच्या श्वास मोजणाऱ्या लेकीला आईनं दिलं जीवनदान

आपल्या बाळावर कोणतेही संकट आले तर आई आपल्या जीवाची पर्वा न करता, बाळाला संकटामधून बाहेर काढते.
हृदय पिळवटणारी घटना! अखेरच्या श्वास मोजणाऱ्या लेकीला आईनं दिलं जीवनदान
हृदय पिळवटणारी घटना! अखेरच्या श्वास मोजणाऱ्या लेकीला आईनं दिलं जीवनदानSaam Tv

औरंगाबाद : आई आणि बाळाचे नाते हे जगातील सर्वात मजबूत नातं मानले जातं. आपल्या बाळावर कोणतेही संकट आले तर आई आपल्या जीवाची पर्वा न करता, बाळाला संकटामधून बाहेर काढते. अशीच एक घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामधील सिल्लोड (Sillod) येथे घडली आहे. येथील एका ६३ वर्षीय आईने आपल्या ४० वर्षीय विवाहित मुलीला किडनी देत जीवनदान दिले आहे. नववर्षाच्या पहिल्यादिवशी मुलीवर किडनी (Kidney) प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यामुळे मुलीला नवीन जीवनदान मिळाले आहे.

हे देखील पहा-

सिल्लोड तालुक्यातील पांगरी (Pangri) येथील रहिवासी असणाऱ्या छाया अशोक झरवाल या मागील ३ वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये (hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण मागील काही दिवसांपासून त्यांचा हा त्रास खूपच वाढतच चाला होता. त्यामुळे त्या डायलिसिस प्रक्रियेवर जगत होते. पण डायलिसिसची प्रक्रिया छाया यांना जास्त दिवस वाचवू शकणारी नव्हती. (Mother saved daughter life by donating kidney)

यामुळे छाया यांचा जीव वाचवण्याकरिता किडनी प्रत्यारोपण करणे हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. पण घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे हा खर्च छाया यांच्या घरच्यांना आजिबात परवडणारा नव्हता. लेकीला किडनीची गरज असल्याचे कळल्यावर, छाया यांच्या ६३ वर्षीय आई रुखमनबाई माहोर यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, त्वरित किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता.

हृदय पिळवटणारी घटना! अखेरच्या श्वास मोजणाऱ्या लेकीला आईनं दिलं जीवनदान
अनोखं प्रेम! नागपुरात दोन मैत्रिणींनी आयुष्यभराच्या बंधनात उरकलं साक्षगंध

यानंतर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात छाया यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ६३ वर्षीय आईने आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लेकीला किडनी दान केल्यामुळे अनेकांना गहिवरून आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी आईने लेकीला नवीन जीवन दिल्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com