Monsoon Season Update : वेध लागले पावसाचे !... मान्सून आगमनाची तारीखच सांगितली, IMD ने वर्तवला अंदाज

IMD Press Conference : यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी वर्तवलीय. सध्याची परिस्थिती मान्सूनसाठी आशादायी असून सध्याची परिस्थिती मान्सूनच्यादृष्टीने चांगली असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.
Maharashatra Monsoon
Monsoon Season Update Informal News
Published On

(प्रमोद जगताप)

Maharashatra Monsoon Update :

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनविषयी महत्त्वाची अपडेट दिलीय. यावर्षी देशभरात वरुण राजा धो-धो कोसळेल, असा होण्याचा अंदाज हवामन विभागाने वर्तवलाय. यावर्षी ८ जूनपर्यंत मान्सून येणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाळा असणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी दिलीय.

सध्याची परिस्थिती मान्सूनसाठी आशादायी असून सध्याची परिस्थिती मान्सूनच्यादृष्टीने चांगली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्यादृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी वर्तवलीय. यंदा जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा राहणार असून या काळात ८७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात ५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १०४-१०६ टक्के वरुण राजा बरसणार आहे.

सध्या अल निनोची परिस्थिती सध्या moderate आहे. हा प्रभाव कमी होत आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपेल, अशी माहिती एम मोहपात्रा यांनी दिलीय. भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज मे महिन्यात वर्तवला जाणार आहे.

Maharashatra Monsoon
Weather Forecast: सावधान! पुढील ४८ तासांत कोसळणार अतिमुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com