पर्यटन स्थळांवर माकडांचा उच्छाद, माकडांचे पर्यटकांवर हल्ले, वनविभाग झोपलेलं

Monkey Attacks Surge at Harihar Fort & Brahmagiri Hills: तुम्ही पर्यटनाला किंवा ट्रेकिंगला जात असाल तर ही बातमी चुकवू नका......महाराष्ट्रातल्या पर्यटन स्थळांवर हल्ले होत असून सध्या पर्य़टकांमध्ये दहशत पसरलीय. कोण करतंय हल्ले? कुणामुळे ही दहशत पसरलीय? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...........
MONKEY ATTACKS ON TOURISTS IN MAHARASHTRA TREKKING SITES SAFETY ALERT
MONKEY ATTACKS ON TOURISTS IN MAHARASHTRA TREKKING SITES SAFETY ALERTsaam tv
Published On

वीकेंड आला की इन्स्टाग्रामवर रील्स टाकण्यासाठी सगळ्यांनाच ट्रेकिंगला जाऊन 'नेचरचे वाइब्स' घ्यायचे आहेत...पण जरा थांबा...नाशिक जिल्ह्याची शान असलेले हरीहर गड आणि ब्रह्मगिरी डोंगर सध्या पर्यटकांच्या नव्हे, तर माकडांच्या ताब्यात गेले आहेत...पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य पाहायला जाणाऱ्या पर्यटकांवर माकडांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये कमालीची भीती पसरलीय....

हरीहर गडाची खडी चढण आणि जीव मुठीत धरून चालणारा हा ट्रेकर....मात्र अचानक माकडांनी या पर्यटकांना गाठलं...आणि त्यांची काय अवस्था झाली ते पाहा.... एक पाय खाली ठेवला तर खोल दरी आणि वर बघितलं तर तांडव करणारी माकडांची गँग...ही माकडं आता थेट ट्रेकर्सच्या पाठीवर आणि अंगावर स्वारी करतायत... बॅगेत खाऊ असो वा नसो, "पहिले पावती दे मगच पुढे जा," अशा थाटात या माकडांनी उच्छाद मांडलाय..

आता हा दुसरा व्हिडिओ बघा.. ट्रेकिंग करून पार थकलेल्या ट्रेकरच्या पाठिवर बसून ही माकडं ग़डाची सफर करतायत...दुसरीकडे या ताईचा ओरडून ओरडून पार घसा बसला तरी ही माकडं तिच पाठ सोडायला तयार नाहीत... त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी डोंगराची गोष्ट तर आणखीनच भारी आहे. इथे माकडांनी सरळ 'वसुली भाई'चा अवतार घेतलाय. पायऱ्यांवरून वर जाताना ही माकडे थेट पर्यटकांच्या खांद्यावर बसून शिष्टाचाराचा पूर्ण फज्जा उडवताहेत. कोणी खाद्यपदार्थ दिले नाही आणि विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर ही माकडे थेट 'कुस्तीच्या आखाड्यात' उतरतात... आणि हवं नको ते सगळं विस्कटून टाकतात... त्यामुळे ट्रेकिंगला किंवा पर्यटनाला जात असाल तर काय काळजी घ्य़ायची ते ऐका...

राज्यातल्या अनेक पर्यटन स्थळांवर माकडांच्या पर्य़टकांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र वनविभाग झोपलेलं दिसतंय. त्यामुळे तुम्ही पर्यटनाला किंवा ट्रेकिंगला जात असाल तुमची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. नाहीतर गड सर करण्याआधी माकडं तुमच्यावर हल्ला करून तुमची बॅग कधी पळवतील तुम्हालाही कळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com