अपघातात आईची ताटातूट झाली; जखमी वानराचे पिल्लू वन्यजीव अभ्यासकाला बिलगले!

आई नसली म्हणून काय झालं, एखादा मायेचा हात आयुष्यात मोठा आधार ठरतो. ही अनुभूती केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही येते.
अपघातात आईची ताटातूट झाली; जखमी वानराचे पिल्लू वन्यजीव अभ्यासकाला बिलगले!
अपघातात आईची ताटातूट झाली; जखमी वानराचे पिल्लू वन्यजीव अभ्यासकाला बिलगले! डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : अपघातात एक वानराच्या पिलाची आणि त्याच्या आईची ताटातूट झाली. वानराचे जखमी अवस्थेत असलेलं पिल्लू रस्त्याच्या कडेला बसलं. मात्र, वन्यजीव अभ्यासक दिसल्यानंतर ते पिल्लू त्यांच्या पायाला बिलगले. जसं त्याची आई त्याला मिळाली! ही हृदयस्पर्शी घटना औरंगाबादमध्ये घडलीय. एका वानराची आणि तिच्या पिलाची ताटातूट झाल्यानंतरची ही हृदयस्पर्शी गोष्ट आहे. आई नसली म्हणून काय झालं, एखादा मायेचा हात आयुष्यात मोठा आधार ठरतो. ही अनुभूती केवळ माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही येते.

हे देखील पहा :

औरंगाबाद शहरातील जालना रस्ता हा प्रचंड वर्दळीचा आहे. तो ओलांडणे कधीकधी माणसालाही शक्य होत नाही. नेमके तिथेच एक वानराचे पिल्लू आपल्या आईसोबत रस्ता ओलांडायला लागले आणि घात झाला. एका भरधाव चारचाकी वाहनाने त्याला धडक दिली. यात आई घाबरून पुढे निघून गेल्याने आईशी ताटातूट झालीच शिवाय पिल्‍लूही गंभीर जखमी झाले. काही वेळात तिथे दाखल झालेल्या वन्यजीव अभ्यासकाच्या पायाला जेव्हा ते पिलू बिलगले. तो प्रसंग तर हृदय पिळवटणाराच होता.

अपघातात आईची ताटातूट झाली; जखमी वानराचे पिल्लू वन्यजीव अभ्यासकाला बिलगले!
आरोग्य विभागाकडून पहिली ते सातवी चे वर्ग सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

पिलाचा अपघात झाला त्यावेळी वाहनांची एवढी वर्दळ होती कि, त्याला पुढे जाताच आले नाही. अपघातात पिलाच्या हातासोबत तोंडालाही गंभीर जखम झाली होती. अवघ्या तीन महिन्याचे ते वानराचे पिल्लू भेदरलेलं होते. मात्र, एका जागी शांत बसून राहिले. प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ वन विभागाला कळविले. वनविभागाची रेस्क्यू व्हॅन तिथं पोहोचली.

लागलीच त्या पिल्लाला ताब्यात घेत कामगार चौक येथील पशुवैद्यकीय डॉक्टर शीला जाधव यांच्याकडे नेले. वानराच्या पिलाच्या अपघाताने एक डोळा निकामी झाला होता. त्याच्यावर औषोधोपचार केले. जखमी पिलामध्ये सुधारणा होईपर्यंत वनविभागामध्ये ठेवले जाणार आहे. नंतर त्याला आईजवळ सोडण्यात येणार आहे.

अपघातात आईची ताटातूट झाली; जखमी वानराचे पिल्लू वन्यजीव अभ्यासकाला बिलगले!
रिक्षा उभी करण्यावरून वाद, दोघांना मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा दाखल!

वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर, आप्पासाहेब तागड, वनरक्षक एच. के. गुसिंगे, वन्यजिव अभ्यासक श्रीकांत वाहुळे, वनरक्षक व्ही.आर.साळवे, वनरक्षक उज्वला सोनवणे यांनी मोलाची कामगिरी केली. वन विभागाचे कर्मचारी श्रीकांत वाहुळे तिथं पोहचल्यानंतर वानराच्या जखमी पिलाच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हाच आईपासून दूर गेले पिल्लुही त्यांच्या पायाला बिलगले. हा प्रसंग मन सुन्न करणारा होता. अपघातामुळे आईशी झालेली ताटातूट त्यात लगेच फिरलेला मायेचा हात यामुळे पिलाची ही कृती हृदयस्पर्शी होती.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com