OTT प्लॅटफॉर्म आणि लहान मुलांच्या मोबाईल वापरासंबंधी मोहन भागवतांनी केलं मोठं विधान! (पहा व्हिडीओ)

लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल गेले आणि ते काय बघतात काय नाही यावरती कसलच नियंत्रन नाही.
मोहन भागवत
मोहन भागवतSaamTV

नागपूर - ओटीटी प्लॅटफॉर्मवरती OTT Platform कसली, कसली चित्र येतात, त्या प्लॅटफॉर्मवरती काय-काय दाखवलं जातं याबाबतच कसलच बंधन नाही, नियंत्रण नाही. शिवाय लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल Mobile गेले आणि कोरोना काळापासून ते प्रमाण वाढलं ती मुलं काय बघतात काय नाही यावरती कसलच नियंत्रन Control नाही. आणि या बाबतीत नियंत्रण आणायला हवं अस मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा RSS विजयादशमी उत्सव कार्यक्रमात नागपूर मध्ये बोलत होते.(Mohan Bhagwat's statement regarding OTT platform and mobile usage of children)

पहा व्हिडीओ -

दसऱ्याच्या Dasara दिवशी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. तेंव्हा पासून दसऱ्याच्या दिवशी संघाचा हा दसऱ्याला भव्यदिव्य कार्यक्रम असतो मात्र कोरोनामुळे फक्त 200 लोकांच्या उपस्थिती आजचा कार्यक्रम पार पडला. संघाचा आजच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी स्वयंसेवकांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय National-international स्तरावरील विषयांवर भाष्य तर केलंच मात्र तरुण पिढीतील वाढती व्यसनांधता आणि मोबाईलचा दुरुपयोग यावरती देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

मोहन भागवत
"महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेच वाघ होते, तुमच्या सारख्या हुजऱ्यांना शेपटाचीही उपमा देता येणार नाही"

तसेच देशात वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं Addiction करण्यासाठी नवनवे नशेचे पदार्थ बाजारात येत आहेत. आणि ते पदार्थ सेवन करण्याची अनेक तरुण पिढी ची सवय वाढत आहे. तसेच हे नशेचे पदार्थ सीमेपलीकडचे देश आपल्या देशात पाठवत आहेत आणि त्यातून मिळणारा देशविघातक कृत्यांसाठी वापरला जात असल्याचही त्यांनी सांगितलं. दरम्यान या सर्वांवरती सरकार कारवाई Goverment Action करेलच मात्र तो पर्यंत आपण आपल्या मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक त्यामुळे प्रत्येकाने आपल्य़ा मुलांना घरात योग्य संस्कार द्यायला हवंत ज्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या अधीन जाणार नाही असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com