Mob Lynching in Nashik : नाशिकमध्ये पुन्हा मॉब लिन्चिंगची घटना, जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

Nashik News : घोटी-सिन्नर हायवेवर एसएमबीटी कॉलेज समोर काल रात्री ही घटना घडली आहे.
Sangli Crime News
Sangli Crime NewsSaam tv
Published On

तरबेज शेख

Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा एकदा मॉब लिन्चिंगची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाकडून एका तरुणाची हत्या करण्यात आली. तर या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. 15 दिवसातील ही दुसरी घटना असल्याने समाजकंटकांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घोटी-सिन्नर हायवेवर एसएमबीटी कॉलेज समोर काल रात्री गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाकडून 2 तरुणांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला असू न दुसरा तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे तरुण आपल्या चारचाकी गाडीतून मांस घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेत आफान अन्सारी वय 25 या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दोघेही तरुण मुंबईच्या कुर्ला येथील रहिवासी आहेत. (Nashik News)

Sangli Crime News
Pune News : 'व्वा रे व्वा विखे पाटील!', लाचखोर IAS अनिल रामोडची बदली रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना केलेली शिफारस, अंबादास दानवेंनी पत्र केलं ट्वीट

15 दिवसांपूर्वी देखील इगतपुरीमध्ये गोमांस तस्करीच्या संशयावरून अन्सारी नामक 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात 15 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेत राष्ट्रीय बजरंग दल नाशिक जिल्हा अध्यक्षासह 6 हल्लेखोरांना पोलिसांनी याप्रकरणी करत ताब्यात घेतले. उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहे. (Crime News)

Sangli Crime News
Ghatkopar Building Part Collapse: घाटकोपरमधील इमारतीचा भाग कोसळला; २ जण अडकल्याची माहिती

या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात पुन्हा एकदा मॉब लिन्चिंगची घटना समोर आली. या प्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 8 संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करत एक हजार पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले आहेत. त्यात अशा घटनांमधील मुख्य समाज कंटाकवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com