Sanjay Nirupam : संजय निरुपम यांच्या उमेदवारीला मनसेचा विरोध; मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी महायुतीचा तिढा कायम

MNS Opposition to Sanjay Nirupam Candidature : मुंबई उत्तर पश्चिम जागेवर महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. अशात या जागेसाठी संजय निरूपम यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्यांना मनसेचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.
Sanjay Nirupam News
Sanjay Nirupam NewsSaam TV

सचिन गाड

राज्यात लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. मात्र अद्यापही महायुतीमधील काही जागांवरील तिढा कायम आहे. मुंबई उत्तर पश्चिम जागेवर महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. अशात या जागेसाठी संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्यांना मनसेचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Nirupam News
Lok Sabha Election 2024 : माढातून शेकापची, सोलापूरात वंचितच्या उमेदवाराची माघार; राहुल गायकवाडांनी सांगितलं धक्कादायक कारण

काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसची साथ सोडल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. मात्र महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला दिलीये. त्यामुळे महायुतीकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा झाली.

त्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेसची साथ सोडली. या जागेवर लढण्यासाठी संजय निरुपम इच्छुक आहेत. महायुतीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे या जागेसाठी संजय निरुपम यांचा शिंदे गटात प्रवेश होणार अशीही चर्चा आहे.

संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरू होताच महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विरोध व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे आता महायुतीमध्ये संजय निरुपम यांना ही जागा मिळणार की, महायुतीकडून दुसऱ्या उमेदवाराच्या नावाचा विचार केला जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sanjay Nirupam News
Sanjay Raut: फडणवीसांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधानपदाचं स्वप्न पडलं; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com