Raj Thackeray Latest Speech: महाराष्ट्रातील राजकारण ते टोलवसुली; राज ठाकरे यांच्या भाषणातील ५ ठळक मुद्दे

Raj Thackeray Latest Speech: मुंबई-कोकण पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुका ताकदीने लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

Raj Thackeray News:

मुंबई-कोकण पदवीधर मतदारसंघात लवकरच निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. या मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. या निवडणुकीसाठी मनसेनेही तयारी सुरु केली आहे. मुंबई-कोकण पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुका ताकदीने लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच राज ठाकरे यांनी यावेळी राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यावरही भाष्य केलं. (Latest Marathi News)

मुंबई, ठाणे आणि कल्याण, डोंबवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी मनसेने शिबीर आयोजित केलं होतं. या शिबिरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, 'मुंबई-कोकण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुका आपण ताकदीने लढवणार आहोत. प्रमोद नवलकरांनी यांनी मला पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा फॉर्म दाखवला होता. त्या फॉर्मवर खाली लिहिलं होतं की, सही किंवा अंगठा... याचा अर्थ उमेदवार हा पदवीधर असलाच पाहिजे असं काही नाही. शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीत तसंच आहे. उमेदवार शिक्षक असला पाहिजे अशी काही अट नाही. यालाच लोकशाही म्हणतात'.

राज्याच्या राजकारणाचा विचका करून ठेवलाय : राज ठाकरे

महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, ' जगाच्या पाठीवर अशी कुठेही राजकीय परिस्थिती नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. राज्यात निम्मा पक्ष सत्तेत आहे आणि निम्मा पक्ष विरोधी पक्षात आहे. शिवसेना सत्तेतही आणि विरोधातही आणि तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत आहे. यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका करून ठेवलाय'.

Raj Thackeray Latest News
Lalit Patil Case: चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येणार, बोलणाऱ्यांची तोंडं बंद होणार: देवेंद्र फडणवीस

टोलच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न

टोलच्या मुद्द्यावर भाष्य करताना राज ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ' टोलच्या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारला आहे. आरटीओत रोज हजारो नव्या गाड्यांची नोंदणी होते. मात्र, तरीही राज्यात गाड्यांची संख्या तेवढीच कशी? राज्यात गाड्या वाढल्या तर टोलही जास्त जमा होतोय. पण टोल जास्त जमा होतोय तर तो वाढवायची गरज काय आहे? या टोलवसुलीचा अवधी तितकाच कसा ? असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले.

टोलनाक्यांवर मनसेची करडी नजर : राज ठाकरे

'टोलनाक्यांवर मनसेची आता करडी नजर असणार आहे. मनसेतर्फे ९० कॅमेरे टोलनाक्यांवर लावले गेले आहेत, आता बघू टोलवाले कसे फसवतात ते पाहुयात. टोल नाक्यावर पिवळ्या रेषेच्या बाहेर गाडी दिसली की थेट सोडायची. माझ्या सहकाऱ्यांचंही यावर बारीक लक्ष असलं पाहिजे, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

इतके पैसे देऊनही पूल पडला कसा? राज ठाकरे

'काल कोकणात पूल कोसळला. या पुलाचं कंत्राट हे किशोर रुपचंदानी यांना १४० कोटी रुपयांना दिलं होतं. इतके पैसे देऊनही तो पूल पडला कसा? कोकणातल्या अजून एक रस्त्याचंही त्याच काम दिलं आहे. हा कंत्राटदार कुणाचा लाडका आहे ? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

Raj Thackeray Latest News
Gadchiroli Crime News: कुटुंबात विष कालवलं! एकाच घरातील ५ जणांच्या मृत्यूचं गूढ उकललं, सूनेचं काळं कृत्य आलं समोर

...पण रवींद्र चव्हाणांचा कुणी राजीनामा मागत नाही : राज ठाकरे

'पूल कोसळतात, खड्डयात लोक अपघाताने मरत आहेत. तरीही अशा कंत्राटदाराला मुंबई-कोकणात हजारो कोटी रुपयांची कामे दिली गेली आहेत. याची फक्त १ दिवसाची बातमी होते. संबंधित मंत्री रवींद्र चव्हाणांचा कुणी राजीनामाही मागत नाही, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com