

वर्धा: सेलसुरा (wardha Accident) गावाच्या नदीत कार कोसळून सात जणांचा नुकताच अपघाती मृत्यू झाला हाेता. हे सातही सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यलयाचे मेडिकलचे विद्यार्थी हाेते. यामध्ये गोंदिया जिल्हाच्या तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहंगडाले (vijay rahangdale) यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले (avikshar rahangdale) याचा समावेश होता. आमदार विजय राहंगडाले यांना सांत्वन भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्या घरी येताहेत. रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सहकुटूंब रहांगडाले कुटूंबियांची भेट घेत सांत्वन केले होते. याप्रसंगी आमदार विजय रहांगडाले यांना अश्रु अनावर झाले त्यामुळे इतरांचेही डोळे पाणावले. (MLA vijay rahangdale cried in front of the nitin gadkari; Gadkari is also emotional while comforting Rahangdale family)
हे देखील पहा -
यावेळी गडकरी (nitin gadkari) यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले अपघात कसा झाला त्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना तसेच ऑटोमोबाईलच्यामुळे तर हे अपघात झाले नाहीना या सगळ्यांची चौकशीचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टी (road safety) बद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल असेही गडकरींनी नमूद केले.
वर्धा (wardha) येथे झालेले अपघात ही घटना खूप दुर्भाग्य पूर्ण आहे. रहांगडाले परिवारा सोबत माझे घरगुती संबंध आहेत म्हणून आज इथे आपल्यासह परिवारासोबत त्यांच्या कुटुबियांना भेट देण्यासाठी आलाे. रहांगडाले कुटुबियांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे अशीच प्राथना करतो असेही गडकरी अशी प्रतिक्रिया यावेळी गडकरींनी दिली.
त्याचप्रमाणे, या भीषण अपघाताची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) घेतली. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी PMNRF मधून प्रत्येकी 2 लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. "महाराष्ट्रातील सेलसुराजवळ झालेल्या भीषण अपघातामधील जीवितहानीमुळे मला दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमी लोक लवकर बरे व्हावेत यासठी मी प्रार्थना करतो, असं ट्विट करत पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे."
दरम्यान मुलाच्या अपघाती निधनाने आमदार विजय यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. त्यांनी फेसबुकवर कविता शेयर करत आपलं दुखं व्यक्त केलं.
आमदार विजय रहांगडाले यांनी शेयर कलेली कविता:
आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं;
अविष्कार आमचा हिरा, होता आनंदाचा झरा;
डॉक्टर नव्हते खमारी गावात, होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात;
बापाचे स्वप्न पूर्ण करण्या,गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;
लागली कुणाची नजर, आज दगडालाही फुटली पाझर;
गेला तरुण वयात सोडून, केलेले सारे वादे तोडून;
तुझी आई आजही वाट पाही, तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;
कसे समझवू तिला, तू परत येणार नाहीस मुला;
कुठे हरवलास पाखरा, परत ये रे आमच्या लेकरा;
गेलास अविष्कार आम्हाला सोडून, तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून
आज आहे मातम सगळीकडे, आई बाबा संगे सारा गाव ही रडे
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इतर सहा जणांची नावे -
नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस
नितेश सिंग, २०१५ इंटर्न एमबीएएस
विवेक नंदन २०१८, एमबीएबीएस फायनल पार्ट १
प्रत्युश सिंग, २०१७, एमबीबीएस फायनल पार्ट २
शुभम जयस्वाल, २०१७ एमबीबीएस फायनल पार्ट २
पवन शक्ती 2020 एमबीबीएस फायनल पार्ट १
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.