'गड आला पण माझा सिंह गेला; आमदार फुटणं गंभीर; उद्या दिल्लीला जाणार'

'काँग्रेसचे आमदार फुटल्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, उद्या दिल्लीला जावून पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करणार, त्यांच्या कानावर सर्व प्रकार घालणार.'
Congress Leader Bhai Jagtap
Congress Leader Bhai JagtapSaam TV
Published On

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुका काल पार पडल्या. या निवडणुकांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. मात्र, काल हाती आलेल्या निकालानुसार आघाडीतील पक्षांनी आपआपल्या पक्षाच्या आमदारांना प्राधान्य दिल्याचं दिसून आलं आहे. (Vidhan Parishad Election)

तसंच काही मतं फुटल्यामुळे काँग्रेसला (Congress) एक जागा गमवावी लागली. काँग्रेसचे भाई जगताप (Bhai Jagtap) विजयी झाले तर चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी काल झालेला प्रकार सहन केला जाणार नसून काँग्रेसचे आमदार फुटल्याचं प्रकरण गांभीर्याने घेतल असल्याचं काँग्रेस आमदार भाई जगताप म्हणाले.

Congress Leader Bhai Jagtap
'अकेला देवेंद्र क्या करेंगा म्हणणाऱ्यांना...' ; भाजप नेत्याचा महाविकास आघाडीवर घणाघात

कालच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे विधान परिषदेचे विजयी उमेदवार भाई जगताप म्हणाले, 'गड आला पण, माझा सिंह गेला याचं दुःख आहे. काँग्रेसचे आमदार (MLA) फुटले, हे गांभीर्याने घेतल आहे. हा प्रकार सहन केला जाणार नाही, या बाबत उद्या दिल्लीला जावून पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करणार, त्यांच्या कानावर सर्व प्रकार घालणार असल्याचे त्यांनी सांगितलं. तसंच मला शब्द दिलेले अपक्ष आमदार माझ्यासोबत राहिले पण आमच्याच आमदारांची मत फुटल्याने हांडोरे यांचा पराभव झाला असल्याचंही जगताप म्हणाले आहेत.

विधान परिषद निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीला, विशेष करून काँग्रेसला जोरदार फटका बसल्याचं दिसत आहे. काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागल्याने या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस नेत्यांनीच आमच्याच आमदारांची मतं फुटल्याचं सांगितलं आहे.

काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना २९ मते देण्याचे ठरवलं होतं. मात्र, यांना पहिल्या पसंतीच्या २२ मतं मिळाली. तर भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १७ मतांची अपेक्षा होती. मात्र त्यांना १९ मते पडली आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com