- नवनीत तापडीया
Uddhav Thackeray Barsu Visit Today : बारसू प्रकल्पासंदर्भात (barsu refinery) राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांशी समन्वय साधून आहेत. आपण जायच चार लोकांच ऐकायच आणि आपलं मत बनवायच असे त्यांचे सुरू आहे. त्यांची दिशाभूल कोण करत उद्धव ठाकरेंना कळायला हवं असे आमदार संजय शिरसाट (Mla Sanjay Shirsat) यांनी नमूद केले. (Maharashtra News)
आमदार शिरसाट म्हणाले एखादा प्रकल्प येत असेल तर त्याला विरोध करायचा अशी स्टॅटीजी सध्या सुरू आहे. समृद्धी महामार्गालाही असाच विरोध झाला, परंतु आज तो आमची लाईफ लाईन झाला आहे. आपल राजकारण तिथे जाऊन करण्यात काही पाॅईंट नाही. ही भुमिका त्यांची योग्य नाही असे शिरसाट यांनी नमूद केले.
राज्य पेटवायची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही असे शिरसाट यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटलं. ते म्हणाले अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे त्यांची आग विझून जाईल. विचार करा, जो मुख्यमंत्री सर्वांना भेटतो, याला जर हुकुमशाही म्हणता ? मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सारख लॉक लावून वर्षामध्ये बसायचं का ?
आमदार शिरसाट म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या कामांमुळे जनेतला आपला मुख्यमंत्री आला आहे असे वाटत आहे. या मुख्यमंत्र्यांना जर तुम्ही हुकुमशाही म्हणत असाल तर तुम्ही लोकशाहीची माेठी थट्टा करीत आहात.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.