Ravi Rana : अशोक चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे १० ते १५ आमदार संपर्कात; आमदार रवी राणा यांचा मोठा दावा

Ravi Rana Latest on Ashok Chavan : अशोक चव्हाण हे राजीनाम्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
ravi rana on ashok chavan
ravi rana on ashok chavan Saam tv
Published On

Ravi Rana News :

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण हे राजीनाम्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात आहेत, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. (Latest Marathi News)

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रवी राणा यांनी पहिली प्रतिक्रिया देत मोठा दावा केला. अशोक चव्हाणांच्या सोबत काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात आहेत. मी याआधी पण काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचे सांगितलं होतं. येत्या १५ तारखेला अमित शहा विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा आणखी मोठे धक्के पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार गटात मोठे धक्के पाहायला मिळेल. राहिलेले पक्ष सुद्धा रिकामा होईल, असा दावा रवी राणा यांनी केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ravi rana on ashok chavan
Maharashtra Politics: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता; आमदारांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू!

यशोमती ठाकूर भाजपच्या संपर्कात : रवी राणा

यशोमती ठाकूर देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे. 'तीवसा मतदारसंघाच्या आमदार व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या सुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र भाजपने त्यांना थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ सुद्धा रिकाम होणार आहे, असाही दावा राणा यांनी केला आहे.

ravi rana on ashok chavan
Ashok Chavan: प्रामणिकपणे काम केलं; भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही... राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया!

रवी राणा यांच्या दाव्यानंतर यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर

यशोमती ठाकूर या भाजपमध्ये जाणार असल्याचा रवी राणा यांनी दावा केला होता . यावर आमदार यशोमती ठाकूरर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. 'आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे स्वत: दलबदलू आहे. हे दोघेही वायफळ बडबड करत असतात. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आले. ते दुसऱ्यांवर सतत बोलत आहेत, असे प्रत्युत्तर यशोमती ठाकूर यांनी दिले.

'आम्ही जिथे आहोत, तिथे आहोत, आमचं संपूर्ण आयुष्य सर्व धर्म समभावासाठी गेलं तरी चालेल. आम्ही जिथे आहे, तिथेच आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com