Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा मर्डर होणार होता; आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा

Dhananjay Munde Assassination Plot: धनंजय मुंडे यांची हत्या आखण्यात आला होता असा धक्कादायक दावा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झालाय.
Dhananjay Munde Assassination Plot
MLA Ratanakar Gutte and Dhananjay Munde amid heated political controversy over alleged murder conspiracy.saam tv
Published On
Summary
  • रत्नाकर गुट्टे यांचा धनंजय मुंडेंबाबत धक्कादायक दावा

  • धनंजय मुंडेंच्या हत्याचा कट रचला गेला आमदाराचा खळबळजनक दावा

  • दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळापासून राजकीय वैर

ऐकलंत, धनंजय मुंडेंची हत्या झाली असती मात्र ते वाचले, असं वक्तव्य केलंय रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंनी आणि त्याला कारण ठरलंय धनंजय मुंडेंनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर सडकून केलेली टीका. याच टीकेला प्रत्युत्तर देतांना रत्नाकर गुट्टेंनी धनंजय मुंडेंच्या हत्येबाबत खळबळजनक दावा केलाय.

Dhananjay Munde Assassination Plot
Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

दुसरीकडे धनंजय मुंडेंनी दोनच दिवसांपुर्वी जाहीर सभेतून आपल्याला राजकारणातूनच नाही तर जीवनातून संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. खरंतर धनंजय मुंडे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यात अनेक वर्षांपासून वैर आहे. त्यातच रत्नाकर गुट्टेंचा जावई राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारीही केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर जमीन घोटाळ्याचे आरोप केले.

Dhananjay Munde Assassination Plot
Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

त्याला प्रत्युत्तर देतांना रत्नाकर गुट्टेंनी मुंडेंना आव्हान दिलंय.. त्यामुळे आतापर्यंत अप्रत्यक्षपणे सुरु असलेला मुंडे विरुद्ध गुट्टे संघर्ष आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. मात्र राजकारणाची सुसंस्कृत परंपरा असलेल्या महाराष्ट्रात राजकारण धनंजय मुंडेंच्या हत्येच्या कटापर्यंत जात असेल तर महाराष्ट्राची राजकीय वाटचाल बिहारच्या दिशेने सुरु झालीय का? याचा विचार करायला हवा. एवढंच नाही तर मुंडेंच्या जीवावर कोण उठलंय. याचीही चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com