Wardha APMC Election Result: देवळी बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता; आमदार रणजित कांबळे गटाचा बोलबाला

या निवडणुकीत भाजपाचा सुपडासाफ झाला असून या निवडणुकीमध्ये भाजपाला खातेही उघडता आले नाही.
Wardha APMC Election Result
Wardha APMC Election ResultSaam Tv
Published On

चेतन व्यास, वर्धा

Wardha Latest News: राज्यातील 147 बाजार समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. अनेक ठिकाणी संमिश्र निकाल लागले आहेत. काही ठिकाणी शिंदे गट आणि राष्ट्रवादी युतीचा विजय झला आहे. तर कुठे भाजप आणि कुठे काँग्रेस-ठाकरे गटाचा विजय झाला आहे.

काही भागात धक्कादायक निकाल लागले आहेत. तर काही भागात अपेक्षित निकाल लागले आहेत. त्यातच आता देवळी तालुक्यातील पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस, सहकार गट प्रणित संपूर्ण पॅनल निवडून आले.  (Latest Marathi News)

Wardha APMC Election Result
Buldhana Market Committee Election Results : बुलढाणा बाजार समिती निवडणूकीत शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाडांना ठाकरे गटाकडून धोबीपछाड

निवडणुकीत भाजपचा (BJP) सुपडासाफ झाला असून या निवडणुकीमध्ये भाजपाला खातेही उघडता आले नाही. काँग्रेसचे (Congress) आमदार रणजित कांबळे यांनी या बाजार समितीवर आपला कब्जा कायम ठेवला आहे.

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदारानी पसंती दाखवली. कृषी उत्पन्न बाजार समिती देवळी पुलगाव ही निवडणूक काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे तसेच भाजप खासदार रामदास तडस यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. (Wardha News)

Wardha APMC Election Result
Pune Breaking: पुण्यात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं करणं काय?

मात्र काँग्रेस व सहकार गटाला मतदारांनी पसंती दाखवून भाजपाला नाकारल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्णच्या पूर्ण अठरा जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे. या बाजारसमितीवर एकहाती मिळालेल्या विजयाचा श्रेय आमदार रणजित कांबळे यांना देण्यात आले आहे. सोबतच येत्या काळात आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी आणखी चांगले काम करणार असल्याच मनोज वसू यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com