Nitesh Rane: आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्य्क राकेश परब कणकवली पोलिसांना शरण

संशयित आरोपी म्हणून राकेश परब यांचं नाव
Nitesh rane
Nitesh raneSaam Tv
Published On

सिंधुदुर्ग: शिवसेना पदाधिकारी संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांची, कणकवली पोलिसांनी चौकशी केली होती. भाजप आमदार नितेश राणेंचा 'पीए' राकेश परब (Rakesh Parab) कणकवली पोलिसांना (police) शरण झाले आहेत. राकेशच्या फोनवरून 36 कॉल्स केले होते. इतर आरोपींना देखील फोन (Phone) करण्यात आले होते. ज्याच्यावर हल्ला करायचा होता तो फोटो (Photo) देखील पाठवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. (Nitesh rane latest news updates)

हे देखील पहा-

नितेश राणे (Nitesh Rane) हे आपल्या वकिलाबरोबर पोलीस ठाण्यामध्ये देखील हजर झाले होते. राणे यांची जवळपास एक तास चौकशी करण्यात आली होती. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.

Nitesh rane
Pune: पुण्यात कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा, रेस्क्यू ऑपरेशनचा सुरु; चालक बेपत्ता

मात्र, तेथे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (court) धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही. मात्र, अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com