"आमदार महेंद्र दळवी यांनी पैशांची कोणतीही मागणी केली नाही"

प्रथमेश काकडे कन्स्ट्रक्शनचे सुनील पाटील यांचा खुलासा
"आमदार महेंद्र दळवी यांनी पैशांची कोणतीही मागणी केली नाही"
"आमदार महेंद्र दळवी यांनी पैशांची कोणतीही मागणी केली नाही"SaamTVNews
Published On

-- राजेश भोस्तेकर

रायगड : पेण तालुक्यातील भाल गावातील सुरू असलेल्या खारबंदीस्त कामात अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी ठेकेदाराकडे 2 कोटींची मागणी केल्याचा आरोप भाजपाचे पेण येथील आमदार रवींद्र पाटील यांनी केला होता. याबाबतचा व्हिडीओ जिल्ह्यात व्हायरल झाला असल्याने चर्चेला उधाण आले होते. मात्र, ठेकेदार प्रथमेश काकडे कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुनील पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी कोणतीही मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केलेली नसल्याचा खुलासा केला आहे.

हे देखील पहा :

त्यामुळे आमदार रवींद्र पाटील यांच्या दळवी वरील केलेल्या आरोपाचा बुमरॅग झाल्याचे दिसून येत आहे. पेण तालुक्यातील भाल येथे शेतात पाणी येऊ नये यासाठी खारलँड विभागातर्फे खारबंदिस्त काम सुरू आहे. खारबंदीस्त काम हे प्रथमेश काकडे कन्स्ट्रक्शनतर्फे केले जात आहे. काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी काम बंद केले होते. या कामाची पाहणी करण्यासाठी पेण विधानसभेचे भाजपा आमदार रवींद्र पाटील हे घटनास्थळी गेले होते. यावेळी अधिकारी आणि ग्रामस्थांसमोर आमदार पाटील यांनी ठेकेदार याच्याकडे आमदार महेंद्र दळवी यांनी 2 कोटींची मागणी केल्याचे सांगितले. पेणच्या कामात अलिबागच्या आमदाराचा हस्तक्षेप कशाला असा सवालाही उपस्थित केला होता.

"आमदार महेंद्र दळवी यांनी पैशांची कोणतीही मागणी केली नाही"
NeoCov या नव्या व्हेरियंटमुळे होईल मृत्यूतांडव!चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांचा धोक्याचा इशारा

यावेळी एका ग्रामस्थांने आमदार महेंद्र दळवी यांनी पैसे कधी मागितले असा सवाल आमदार रवींद्र पाटील यांना विचारून जनतेची दिशाभूल करू नका असे म्हटले. आमदार रवींद्र पाटीलाच्या या व्यक्तव्याचा व्हिडीओ जिल्ह्यात व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत प्रथमेश काकडे कंस्ट्रक्शनच्या वतीने सुनील पाटील यांनी पेण येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र दळवी किंवा कोणत्याही शिवसैनिकाने पैशाची मागणी केली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे. तर काहीजण शिवसेनेला बदनाम करण्याचे काम करून खोटे वृत्त प्रसिद्धी करित आहे. शिवसेना अशा बदनामीला भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवी यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com