धक्कादायक! पाच दिवसांच्या बालकाच्या शरीरात इंजेक्शनची सुई आढळली

जालना येथील स्त्री रुग्णालयात पाच दिवसाच्या बालकाच्या पाठीत नर्सच्या निष्काळजीपणा मुळे इंजेक्शन्सची सुई शरीरात तशीच राहिली.
mismanagement of jalna women hospital in jalna district
mismanagement of jalna women hospital in jalna districtSaam Tv
Published On

जालना : जालना (Jalna ) येथील स्त्री रुग्णालयात पाच दिवसाच्या बालकाच्या पाठीत नर्सच्या निष्काळजीपणा मुळे इंजेक्शन्सची (Injection ) सुई शरीरात तशीच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. सोनोग्राफी केली असता मुलीच्या पाठीत इंजक्शन ची सुई शरीरात आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकारानंतर बालकाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील दोषींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे. (Jalna Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, जाफ्राबाद तालुक्यातील आरदखेडा येथील सुमित्रा जाधव ही महिला पाच दिवसापूर्वी प्रसूतीसाठी जालन्याच्या स्त्री रुग्णालयात दाखल झाली होती. त्यांनी त्यावेळी एका नवजात मुलीला जन्म दिला. बाळाचे वजन कमी भरत असल्याने तिला रुग्णालयातील दक्षता वार्डात दाखल केले. गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू होते. त्यानंतर मुलगी सारखी रडत होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलीच्या आजीने नवजात मुलीला खाजगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात दाखल करताच मुलीची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी मुलीच्या पाठीत इंजक्शनची सुई आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळं रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

mismanagement of jalna women hospital in jalna district
धक्कादायक! कामावरुन कमी केल्याच्या नैराश्यातून तरुणीने घेतला मित्राच्या घरी गळफास

दरम्यान, दक्षता वार्डमध्ये असलेल्या नर्सने नवजात मूलीवर निष्काळजी पणाने उपचार केले. या उपचारादरम्यान नर्सने इंजेक्शन्सची सुई बाळाच्या पाठीत तशीच ठेवल्याने बाळा बाळाची प्रकृती खराब झाल्याचा आरोप नातवाईक आजीने केला आहे. बाळाची प्रकृती ठीक नसल्याने पुन्हा तिला स्त्री रुग्णालयाच्या दक्षता वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बाबत प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात असून निष्काळजीपणा करणाऱ्या नर्स विरुद्ध कारवाई करण्याची मागणी बाळाच्या आजीने केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com