Jalna Crime: 'दारू पाज नाहीतर..' मित्र संतापला अन् जिवाभावाच्या दोस्ताचा जीव घेतला, कुऱ्हाडीनं गळा कापत शिवारात फेकलं अन्..

Jalna Friend Arrested for Killing Friend with Axe: दारू पाजण्याच्या किरकोळ वादातून मित्रानेच आपल्या मित्राची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील जामवाडी शिवारात घडली आहे.
crime case
crime caseSaam Tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही

दारू पाजण्याच्या किरकोळ वादातून मित्रानेच आपल्या मित्राची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील जामवाडी शिवारात हा प्रकार घडला असून, तरूणाचा मृतदेह शिवारात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपास करून संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.

मित्राला दारू न पाजल्याने एका तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. नरेश उर्फ बंटी रंजवे असे मृत तरूणाचे नाव आहे. दारू पिण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि हाणामारी झाली. त्यानंतर आरोपीने नरेशवर कुऱ्हाडीने वार केले. जामवाडी शिवारात ही घटना घडली नंतर मृतदेह तिथेच टाकून आरोपी पसार झाला.

crime case
Black Magic Crime: काळ्या जादूचा संशय, सायको किलरनं मंदिरातील वॉचमनसह २ जणांचे गुप्तांग कापले; परिसरात खळबळ

शुक्रवारी सकाळच्या सुमारास तरूणाचा मृतदेह काही स्थानिक गावकऱ्यांना सापडला. तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून,खुनाचा गुन्हा दाखल केला.

crime case
Raigad: 'माझाही सरपंच देशमुख होण्याची वाट पाहताय?' रायगडच्या सरपंचाना जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, दारू पाजण्यावरून झालेल्या किरकोळ वादातूनच आरोपीने मित्राच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेनंतर एकच परिसरात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com