Rajendra Kumar Gavit : विधानसभेपूर्वी नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा धक्का, गावितांची भाजपला सोडचिठ्ठी, 'तुतारी' फुंकणार

Maharashtra Assembly Election 2024: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
विधानसभेपूर्वी नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा धक्का, गावितांची भाजपाला सोडचिठ्ठी, तुतारी फुंकणार
विधानसभेपूर्वी नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा धक्का, गावितांची भाजपाला सोडचिठ्ठी, तुतारी फुंकणारSaam Tv
Published On

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाचा राजीनामा देताना ते म्हणाले आहेत की, आगामी विधानसभेत शहादा-तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र पक्ष तिकीट देणार नसल्याची त्यांना खात्री झाल्यावर, अखेर राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

विधानसभेपूर्वी नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा धक्का, गावितांची भाजपाला सोडचिठ्ठी, तुतारी फुंकणार
Maharashtra Politics : झालं 'कल्याण'! निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप-शिवसेनेत तणाव, अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास राजेंद्रकुमार गावित इच्छूक आहे. मात्र येथून भाजपचेच राजेश पाडवी आमदार आहेत. आगामी निवडणुकीतही भाजप पुन्हा त्यांचा येथून तिकीट देऊ शकते.

दरम्यान, राजेंद्रकुमार गावित यावीत यांनी 2014 ची विधीसंभ निवडणूक ही राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना तब्बल 11000 हजार मतांनी प्रभाव पत्करावा लागला होता. यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. यानंतर 2019 मध्ये ते शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून इच्छूक होते. मात्र पक्षाने त्यांना तिकीट न देताना राजेश पाडवींना तिकीट दिलं. या निवडणुकीत पाडवी यांनी विजय मिळवला.

विधानसभेपूर्वी नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा धक्का, गावितांची भाजपाला सोडचिठ्ठी, तुतारी फुंकणार
Sharad Pawar: इंदापुरात वारं फिरलं! हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणार का? शरद पवार कार्यकर्त्यांना म्हणाले...

दरम्यान, शहाद्यात राजेंद्रकुमार गावित यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. गावित इतर पक्षात गेल्यास भाजपला येथे मोठा धक्का बसू शकतो. यातच चर्चा आहे की, राजेंद्रकुमार गावित शरद पवार गटात प्रवेश करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com