Dadaji Bhuse: दादाजी भुसेंनी संजय राऊतांना न्यायालयात खेचलं; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Dadaji Bhuse : दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात येथील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केलाय.
Dadaji Bhuse: दादाजी भुसेंनी संजय राऊतांना न्यायालयात खेचलं; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Published On

Defamation Case Against Sanjay Raut:

नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात येथील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केलाय. भुसे यांनी हा फौजदारी खटला दाखल केला असून २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश राऊत यांना देण्यात आले आहेत. दादाजी भूसे यांनी १७८ कोटींचा घोटाळा केल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. (Latest News)

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील लिलावात निघालेला गिरणा सहकारी साखर कारखान्यावरून घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. कारखाना खरेदीच्या नावाने पालकमंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करत घोटाळा केला असं राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या बातमीमुळे आपली बदनामी झाली, असा आक्षेप घेत भुसे यांनी ॲड. सुधीर अक्कर यांच्यामार्फत राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. परंतु राऊत यांनी नोटिसला कोणतेही उत्तर न दिल्याने भुसे यांनी मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केलाय.

या खटल्याच्या प्राथमिक चौकशीत तक्रारदार भुसे यांच्या नावलौकिकाला बाधा येईल, या हेतूने सामना वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. असा निष्कर्ष न्या. संधू यांनी काढला. त्यानुसार राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासंबंधीचा आदेश शनिवारी न्यायालयाने दिला.

याविषयी बोलताना दादाजी भूसे म्हणाले की, संजय राऊत यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना शेअर्स संदर्भात १७८ कोटींचा जो आरोप बेछूट व खोटा आरोप केला तो मालेगावकरांचा अपमान आहे. विधानसभेत त्याचे स्पष्टीकरण मी दिले होते,त्यांनी मालेगावकरांची माफी मागावी अशी नोटीस दिलेली होती, मात्र त्यांनी माफी मागितली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात मालेगाव कोर्टात त्यांच्या विरोधात दावा दाखल केला.

Dadaji Bhuse: दादाजी भुसेंनी संजय राऊतांना न्यायालयात खेचलं; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Nashik News: नाशिकमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे: दादाजी भुसे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com