Pune News: गोखले इन्स्टिट्यूटमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मिलिंद देशमुख अटकेत

Gokhale Institute: गोखले इंस्टीट्यूटमधील मोठा गैरव्यवहार समोर आला आहे, यामध्ये अनेक मोठ मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
gokhale institute
gokhale institute saam tv
Published On

नागपूर येथील सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची जागा फ्री होल्ड करण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी करून, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेच्या शासकीय अनुदान व फीच्या रकमेपैकी १ कोटी ४२ लाख रुपये वापरल्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन सचिव मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

gokhale institute
Raj Thackeray: राज ठाकरेंचं टेंशन वाढणार, मनसे पक्षाची मान्यता रद्द करा; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, पाहा व्हिडिओ

देशमुख यांनी ही रक्कम संस्थेच्या इतर सदस्यांची पूर्वपरवानगी न घेता वापरल्याने संस्थेची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

gokhale institute
Kalyan-Dombivli News : डोंबिवलीकरांच्या मनात एकच प्रश्न अन् भीती; ते काळे आणि हिरवे ठिपके कसले?

तसेच, संस्थेच्या मालकीची हडपसर येथील एक जागा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी देशमुख यांना ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, भारत सेवक समाजाच्या नागपूरमधील सीझ होल्ड जागा फ्री होल्ड करण्यासाठी त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटकडे २०२२ मध्ये दीड कोटींची मागणी केली होती. मात्र ही माहिती संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांना दिली गेली नव्हती.

या आर्थिक अपहार प्रकरणात इतर कोणाचे सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com