कृष्णा काठावरील महापूरातील स्थलांतरित मगरी पात्राकडे परतू लागल्या, सतर्कतेचा इशारा

महापूरात स्वतःचा जीव वाचवत वर उंच भागात स्थलांतर केलेल्या मगरीचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
कृष्णा काठावरील महापूरातील स्थलांतरित मगरी पात्राकडे परतू लागल्या, सतर्कतेचा इशारा
कृष्णा काठावरील महापूरातील स्थलांतरित मगरी पात्राकडे परतू लागल्या, सतर्कतेचा इशाराविजय पाटील
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील आमणापूर येथील नदीपासून सुमारे ३ किलोमीटरवर शिवारात वावरणारी मगर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तर महापूरात स्वतःचा जीव वाचवत वर उंच भागात स्थलांतर केलेल्या मगरीचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. (Migratory crocodiles is returning in river)

हे देखील पहा -

काळा ओढा परिसरात काल रात्री येळावी-आमणापूर रोड, धनगांव-बोरजाईनगर मार्गावर तसेच आजूबाजूला शिवारात, फडतरे मळ्यातही मगर वावरताना अनेक नागरिकांना पहायला मिळाली. या सुमारे दहा फुट लांब मगरीला पाहण्यासाठी बोरजाईनगर, धनगांव, आमणापूर, अनुगडेवाडी येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत वन विभागाला कल्पना देण्यात आली. या ठिकाणी असणारी मगर ही तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित आहे. तिला पकडण्याचा, अगर कोणत्याही प्रकारची इजा पोहचविण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितावर वन विभागाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वनक्षेत्रपाल यांनी दिला आहे.

कृष्णा काठावरील महापूरातील स्थलांतरित मगरी पात्राकडे परतू लागल्या, सतर्कतेचा इशारा
जेजुरी देवसंस्थानने पूरग्रस्तांसाठी दिली 11 लाख रुपयांची मदत; मंदिर खुले करण्याचीही मागणी

२०२१ च्या महापूरात स्वतः चा जीव वाचवत वर उंच भागात स्थलांतर केलेल्या मगरीचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कृष्णा नदीला आलेल्या महापूरानंतर नदीकाठच्या गावातील सखल भागातील नागरिकांनी जसे स्थलांतर केले, तसेच काही मगरींनी आपला अधिवास बदलल्याचे पहायला मिळाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com