Indapur Incident: इंदापूर विहीर दुर्घटना! ६८ तासानंतर चौघांचे मृतदेह सापडले; ५ लाखांच्या मदतीची अजित पवारांची घाेषणा (पाहा व्हिडिओ)

mhasobachiwadi : मंगळवारी घडली हाेती दुर्देवी घटना.
 mhasobachiwadi well, indapur
mhasobachiwadi well, indapursaam tv
Published On

Indapur News : तब्बल 68 तासांच्या अथक परिश्रमानंतर इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीतील (Mhasobawadi) विहिरीतून एनडीआरएफच्या जवानांना (NDRF Jawan) आज (शुक्रवार) चारही मजूरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान या दुर्घटनेत बळी पडेल्या चाैघा मजूरांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत राज्य सरकारने (maharashtra governement) जाहीर केली आहे. त्याची घाेषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत केली. (Maharashtra News)

 mhasobachiwadi well, indapur
Raju Shetti यांची कबूली, 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेत वाद आहेत'; असा काढणार मार्ग सांगितलं शेट्टींनी

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना मंळवारी (ता. एक आॅगस्ट) मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत बेलवाडी (Belwadi) गावातील चार मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले हाेते. आज (शुक्रवार) दुपारी चाैघा मजूरांचे मृतदेह (Indapur Incident latest marathi news) हाती लागल्यानंतर ते थांबविण्यात आले.

 mhasobachiwadi well, indapur
Potholes On Samruddhi Mahamarg : अपघातांची मालिका सुरुच... समृद्धी महामार्गावरील खड्डे कधी बुजणार? प्रशासनास सवाल

या दुर्घटनेतील पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता. त्यानंतर दीड तासाने अन्य दोन मजुरांचा तसेच तासाभराच्या अंतराने चाैथ्या मजूराचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला. सर्व मृत कामगार इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावचे आहेत.

 mhasobachiwadi well, indapur
Kolhapur News : परीक्षेच्या पेपरवर जय श्री राम लिहिले, शिक्षकाने विद्यार्थ्यास हटकले; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपाठाेपाठ काेल्हापूर पाेलिस शाळेत दाखल

प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार या दुर्घटनेत सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलाणी (वय 30), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय 30) आणि मनोज ऊर्फ लक्ष्मण मारुती सावंत (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान आज (शुक्रवार) विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत देण्याची घाेषणा केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com