मेळघाटात अस्वलाचा वनमजुरावर हल्ला; १ जण जखमी

मलकापूर बिट परिसरामध्ये गस्तीवर असताना, एका अस्वलाने हल्ला केला आहे.
मेळघाटात अस्वलाचा वनमजुरावर हल्ला; १ जण जखमी
मेळघाटात अस्वलाचा वनमजुरावर हल्ला; १ जण जखमीजयेश गावंडे

अकोला : पोपटखेड Poptkhed येथील मेळघाट Melghat वन्यजीव विभागातील सातपुड्याच्या जगंलात forest काल दुपारच्या सुमारास वनमजूर मलकापूर Malkapur बिट परिसरामध्ये गस्तीवर असताना, एका अस्वलाने Bear हल्ला केला आहे. यामध्ये रामभाऊ भिकाजी सुरत्ने (वय- 38) राहणार पोपटखेड गंभीर जखमी झाला आहे.

हे देखील पहा-

त्याचावर अकोट Akot ग्रामीण रुग्णालयात hospital प्राथमिक उपचार करून, पूढील उपचारासाठी अकोला या ठिकाणी हलविण्यात आले आहे. मलकापूर बिटमधील लक्कडदेव Lakkaddev परिसरामध्ये राम राजेंद्र नरवास आणि रामभाऊ सुरत्ने हे जगंलात गस्तीवर असताना, अचानक २ अस्वल समोर आले. त्यामधील एका अस्वलाने रामभाऊ यांच्यावर हल्ला चढवला आहे.

मेळघाटात अस्वलाचा वनमजुरावर हल्ला; १ जण जखमी
संगमनेरसह मेळघाटात भुकपांची दहशत

रामभाऊने अस्वलीचा मोठ्या हिम्मतीने प्रतिकार करत जबडा दोन्ही हाताने, दाबून ठेवला आणि जोरजोरात आरडाओरड सुरु केली. अस्वलाने पळ काढल्याने, रामभाऊ याने स्वतःचा आणि सहकारी कर्मचाऱ्यांचा जिव वाचवला आहे. घटनेची माहीती वनविभागाचे अधिकारी पोपटखेड वर्तुळचे वनपाल जी. पी. गायकवाड आणि आर. एम. बिराजदार, विकास मोरे पवार, पाडुरंग तायडे, प्रकाश डाखोरे, बापूराव तायडे यांनी जखमीना उपचारासाठी दाखल केले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com