OBC Meeting: मराठा आरक्षण, ओबीसी सर्वेक्षण; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय घडलं?

OBC Meeting News: ही बैठक संपली असून बैठकीच नेमकं काय झालं त्याची माहिची जाणून घेऊ.
Cm Eknath Shinde
Cm Eknath Shinde Saam Tv
Published On

Mumbai News:

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी दुपारी २ वाजता महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही बैठक आता संपली आहे. (Latest Marathi News)

Cm Eknath Shinde
Pune Crime News: आधी 9 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार, नंतर स्वतःचं संपवलं जीवन; नेमकं कारण काय?

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. याशिवाय ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत, त्यादृष्टीने या बैठकीकडे ओबीसी समाजाचे लक्ष लागून होते. आता ही बैठक संपली असून बैठकीत नेमकं काय झालं त्याची माहिची जाणून घेऊ.

सहयाद्रीच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?

1. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मांडली अशी माहिती ओबीसी नेत्यांनी दिली.

2. बिहारमधील जातीय जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींच सर्वेक्षण होईल.जनगणना हा शब्द काढून सर्वेक्षण हा शब्द वापरला जाईल.

3. चंद्रपूरमधील ओबीसी तरुणांचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस जाणार आहेत.

4. उद्याचा चंद्रपूर बंद ओबीसी महासंघाने मागे घेतला.

5. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही असा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं

भाजप काढणार ओबीसींची जागर यात्रा

भाजपकडून ओबीसींची जागर यात्रा काढण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जागर यात्रेचे नेतृत्व करणारेत. आजचा निर्णय झाला तो प्रत्येक गावापर्यंत पोहोचवला जाणार आहे. २ ऑक्टोबरपासून हिंगणघाट येथून जागर यात्रेला सुरुवात होणार आहे. विदर्भातील हा पहिला टप्पा पोहरादेवी येथे समारोप केला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोहरादेवी येथे हा समारोपाचा कार्यक्रम होईल.

Cm Eknath Shinde
Crime News : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या आईची हत्या, तृणमूलच्या नेत्याला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com