मावळ : काम केले म्हणून श्रेय घेण्यासाठी आलो नाही. कुलदेवतेच्या साक्षीने सांगतो गहुंजेची पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून घेतली. क्षणीक आनंदासाठी (Maval News) गावाला कीड लावून देऊ नका, असे सूतोवाच करताना गावपण जपा, मतभेद विसरून विकास साधा; असे मत मावळचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी केले. (Maval Today News)
आमदार सुनिल शेळके यांच्या (Maval) पुढाकारातून चार कोटी ३६ लाख रूपये विकासनिधीतून सूरू करण्यात येणा-या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे गहुंजे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत शेळके बोलत होते. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनचे भूमीपूजन झाले.
भूमिपूजनाचा मान दिला महिलांना
भूमिपूजनाच्या निमित्ताने मी आपल्याशी मी सुसंवाद साधायला आलो. गावचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य व सरपंच करायला हवी. गावचा विकास व्हावा यासाठी करातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. विकासाची कामे दर्जेदार करून घ्या असे आवाहनही शेळके यांनी केले. दरम्यान शेळके यांची बैलगाडीवरून गावातून मिरवणूक काढण्यात आली. तर भूमिपूजनाचा मान महिलांना देण्यात आला होता. यावेळी महिलांनी विशिष्ट प्रकारच्या साड्या घालून फेटे बांधून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.