सांगलीत चिमुरड्यांनी घेतली लाडक्या बाप्पाची काळजी; चक्क गणेशमुर्तीलाच लावले मास्क

आपल्या लाडक्या बाप्पालाच कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी सांगलीमध्ये चक्क गणेश मुर्तीलाच मास्क लावण्यात आले आहेत.
सांगलीत चिमुरड्यांनी घेतली लाडक्या बाप्पाची काळजी; चक्क गणेशमुर्तीलाच लावले मास्क
सांगलीत चिमुरड्यांनी घेतली लाडक्या बाप्पाची काळजी; चक्क गणेशमुर्तीलाच लावले मास्कविजय पाटील
Published On

सांगली : आजपासून गणेशोत्सवाला (Ganesh Festival) सुरुवात झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज संपुर्ण देशामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. यामध्ये राजकारणातील नेते मंडळी असो वा सिनेश्रृष्टीमधील कलाकार असोत बाप्पाच्या प्रेमाचा मोह कोणालाच आवरता येत नाही. मात्र काही ठिकाणी या गणेशोत्सवात कोरोना नियम (Corona Rules) पाळले जात नाहीत आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे आणि अशातच आपल्या लाडक्या बाप्पालाच कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी सांगलीमध्ये (Sangali) चक्क गणेश मुर्तीलाच मास्क लावण्यात आले आहेत.(Mask applied to Ganesh idol in Sangli)

हे देखील पहा-

मात्र सांगलीमधील लहानग्यांनी गणपती बाप्पांच केलेलं आगमान मात्र चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे कारण या गणपतीच्या मुर्तीला चक्क मास्क (mask) लावून घरी आणण्यात आलं आहे. कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाने काही नियमावली लावल्या आहेत नागरिकांनी मास्क लावून सोशल डीस्टंसिंगच (Social Distancing) पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत तसेच काही ठिकाणी तर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

सांगलीत चिमुरड्यांनी घेतली लाडक्या बाप्पाची काळजी; चक्क गणेशमुर्तीलाच लावले मास्क
'जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाच्या चरणी प्रार्थना!

कोरोना नियमांबाबत जनता जागृत नाही कारण अनेक ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली पहायला मिळत आहे. आणि याच पार्श्वभूमिवर सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे तर चक्क कोरोना असल्याने आपल्या लाडक्या बाप्पाला मास्क लावून घरी आणण्यात आलं आहे. यावरुन आपल्या लाडक्या बाप्पाचीच काळजी या लहानग्यांनी आणि त्यांच्या घराच्यांनी घेतली आहे म्हणायला हरकत नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com