निवासी डाॅक्टर आक्रमक; मुंबईत एक न्याय अन् आम्हांला वेगळा का?

sangli resident doctors on strike
sangli resident doctors on strike
Published On
Summary

राज्यभरात मार्ड संघटनेच्या नेतृत्वाखाली आज निवासी डाॅक्टरांनी आंदोलन छेडले आहे.

सांगली : निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी मिरज येथे आज (शुक्रवार) निवासी डॉक्टरांनी कामबंद करीत आंदोलन छेडले. मिरज शासकीय रुग्णालयासमोर यावेळी निवासी डॉक्टरांनी निदर्शने केली. शैक्षणिक शुल्क माफ करा यासह विविध मागण्यांबाबत मार्ड संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले हाेते. mard-resident-doctor-strike-sangli-marathi-news-sml80

sangli resident doctors on strike
ऑस्ट्रेलियाच्या मातीत स्मृती मंधानाने इतिहास रचला; शतकी खेळी

राज्यातील विविध शासकीय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिका-यांच्या (डॉक्टर) मागण्यांसाठी आज (शुक्रवार) राज्यभरात मार्ड संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. सांगली-मिरज येथील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी देखील या आंदोलनास पाठींबा दिला. सर्वांनी त्यांचे काम बंद ठेवून निदर्शने केली.

गेल्या दीड वर्षांपासून निवासी डॉक्टर जीव धोक्यात घालून काेविड रुग्णांना सेवा देताहेत आहेत. त्यामुळे या काळात शैक्षणिक नुकसान झाले आहे. आमचे शुल्क माफ झाले पाहिजे तसेच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना ज्या पद्धतीने कोविड भत्ता दिला जाताे. त्याच पद्धीने राज्यातील इतर शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना भत्ता मिळावा आदी मागण्यांसाठी हे आंदाेलन असल्याचे अक्षय सताई (अध्यक्ष, निवासी डॉक्टर, संघटना , मिरज) यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com