Marathwada Politics: शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट;  मोठी घडामोड होण्याची शक्यता
Marathwada PoliticsSaam Tv

Marathwada Politics: शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट; मोठी घडामोड होण्याची शक्यता

Hingoli Politics : हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड होणारी एक बातमी हाती आली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार संतोष बांगर यांच्यात भेट झालीय.

ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीमुळे हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ माजलीय. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याचदरम्यान या नेत्याचंची भेट झालीय त्यामुळे तर्क-वितर्क काढले जात आहेत.

खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि अब्दुल सत्तार यांच्या भेटीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची चिन्हं आहेत. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या होत्या. आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटलेत. त्यांची भेटीने हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजलीय. या भेटीमागील कारण होतं, हे मात्र गुलदस्तात राहिलंय.

दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीपासून हिंगोली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. या ठिकाणी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंना उमेदवार बदलावा लागला होता. शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी बाबुरावर कोहळीकर यांना तिकीट दिलं. परंतु बाबुराव कोहळीकर यांचा पराभव झाला. नागेश पाटील आष्टीकरांनी त्यांचा लाखो मतांनी पराभूत केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com