रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्या घटना समोर आली आहे. राहुल कडू असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत होता. सुधागड तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी आपल्या राहत्या घरात त्याने गळफास लाऊन घेतला. राहुल याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी या घटनेने सर्वांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये
शरद पवार महाराष्ट्राच्या सहा दिवस दौऱ्यावर असणार आहेत.
आजच शरद पवार पुण्याला रवाना होणार आहेत.
उद्या शरद पवार यांचा पुणे येथे बालगंधर्व येथे कार्यक्रम आहे.
पुण्यात अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहेत. पुण्यात बार, पबच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे.
रत्नागिरीतून काही वेळात मांडवी एक्प्रेस रवाना होणार आहे.
मुंबईच्या दिशेने जाणारी ही पहिली गाडी असेल. त्यानंतर दोन्ही बाजूच्या गाड्या सुरु करण्यात येतील.
तब्बल 26 तास कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती.
यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात धुव्वाधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नाल्याला पूर आल्याने वाटखेड शेत शिवारात अडकलेल्या शेतमजुरांना दोरीच्या साह्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
रत्नागिरीतील खेडजवळील दिवाणखवटी या ठिकाणी रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. या ठिकाणी चिखल, मलबा काढण्याचं काम २५ तासांपासून सुरू होतं. आता रेल्वे रुळावरील मलबा बाजुला करण्यात आलाय. आता या रेल्वे डिझेल इंजिनने चाचणी केली जाणार. त्यानंतर पँसेंजर गाड्या या मार्गावरुन धावतील. तब्बल 25 तासांहून अधिक काळ कोकण रेल्वे ठप्पहोती. आता लवकर या मार्गावरुन ट्रेन सुरु केली जाईल.
बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील मनकर्णिका नदीला पूर आलाय. गत काही दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. यातच संततधार पावसावर पिके तरली असली तरी प्रकल्प मात्र अद्यापही तळालाच आहेत. यातच आता दमदार पावसाने हजेरी लावल्याने बीडसह आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई या तालुक्यातील ओढे, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
पुजा खेडकर यांच्या बंगल्याला कुलूप कोणी लावलं कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक या बंगल्यावर दाखल झाले होते मात्र घरातून कोणी ही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आता या बंगल्याला एक कुलूप लावण्यात आलंय.
देशभर गाजणाऱ्या महादेव ॲप प्रकरणाचे आता बीड कनेक्शन समोर आले आहे. या ॲपवर बीडमधून चालवल्या जाणाऱ्या सट्टयावर सायबर पोलिसांनी छापा टाकलाय. या वेळी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून विविध बँकांचे 150 एटीएम कार्ड, 67 बँक पासबुक, 100 चेकबुक आणि 25 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
रत्नागिरीतील खेडजवळील दिवाणखवटी या ठिकाणी रेल्वे मार्गावर दरड कोसळली असून या ठिकाणी चिखल, मलबा काढण्याचं काम सुरू आहे. 50 कर्मचारी, 2 जेसीबी, 2 पोकलेन, ट्रॅक्टर आदी यंत्रसामुग्रीने काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाचाही अडथळा येतोय. रुळावर आलेला चिखल, माती काढण्याचे काम सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन आणि जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार आहेत. जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार आहे. १० हजार वृक्ष लावण्याची अट घातली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण स्वीकारले
संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलिस ठाण्यात आक्रमक झाले आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर आत्ता मला त्वरित अटक करा अन्यथा मी इथून उठणार नाही, असा आक्रमक पवित्र त्यांनी घेतला आहे.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिलासा मिळाला नाही. कोर्टाने सिसोदिया यांची २२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सीबीआय प्रकरणात सिसोदिया यांची कोठडी वाढवली आहे.
संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवरून संभाषण सुरू आहे. संभाजीराजे यांच्यावर शाहूवाडी पोलिस ठाण्यात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. विशाळगडावरील अतिक्रमण आणि काल झालेल्या घटनेबाबत संभाजीराजे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून बातचीत सुरू आहे.
कोकण रेल्वे तब्बल 21 तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे. रुळावर आलेली माती काढण्याचे काम सुरु आहे. आणखी एक ते दीड तासांनी रेल्वे मार्ग सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२१ जुलैला पुण्यात ५ हजार भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सगळे नेते सुद्धा उपस्थितीत राहणार आहेत.
लोणावळा येथे फिरायला गेलेल्या १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदीचे आदेश झुगारल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. लोणावळ्यातील सहारा पुलाचा समोरील डोंगराळ भागातील धबधब्यांवर गेलेल्या ७ पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लोणावळ्यातील टायगर पॉइंटर हुल्लडबाजी करत असलेल्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील धरण क्षेत्रात मागील २ दिवसांत चांगला पाऊस झाला. धरणातील पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. पुण्याला महिनाभर पाणी पुरेल एवढा पाणीसाठा खडकवासलामध्ये २४ तासांत जमा झाला आहे. गेल्या २४ तासात खडकवासला धरणात १.४५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
संभाजी राजे छत्रपती यांना अटक करा अशी मागणी मुस्लिम समाजाीने मागणी केली आहे. विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने केली आहेत. गजापूर येथे काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती यांना अटक करा अशी मुस्लिम समाजाने मागणी केली आहे.
कॅम्लिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन झाले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी कंपनीची धुरू सांभाळली होती.
भाजप आषाढी वारीला विशेष ट्रेन सोडणार आहे. याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नियोजन केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दुपारी ३.३० वाजता हिरवा कंदील दाखवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून विशेष ट्रेन सुटणार आहे.
विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरीत कोकण रेल्वे तब्बल 21 तासांहून अधिक काळ ठप्प आहे. रुळावर आलेली माती काढण्याचे काम सुरुच आहे. एक ते दीड तासांनी रेल्वे मार्ग सुरु होईल, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एसटीच्या १७ गाड्या कणकवली स्टेशनवरून सोडण्यात आल्या आहेत. कणकवली रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पुढील प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून एसटीच्या १७ गाड्या सोडण्यात आल्या. वृद्ध,अपंग व आजारी प्रवाशांसाठी एक स्लीपर बसची ही सोय करण्यात आली आहे. मंगलोर एक्स्प्रेस पहाटे पासून कणकवली स्थानकात थांबून आहे. अखेर ही ट्रेन रद्द करण्यात आली. सहा सात तासांनंतर अडकलेले प्रवासी बसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांच्या उपस्थित आज मातोश्रीवर पूजा पार पडली. या पूजेच्यावेळी सर्व ठाकरे कुटुंब उपस्थित होते. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते. अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेला स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी विरोध केला होता. त्यांच्या या भूमीकेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समर्थन दिले होते.
जालन्यात आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे आज झालेल्या पावसामुळे पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तहसील कार्यालयात शासकीय कर्मचारी हे आपल्या विविध मागण्यासाठी उपोषणावर बसले आहेत शासन राज्यात विविध योजना राबवतो मात्र कर्मचारी भरती करत नाही यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर याचा दबाव पडतो यासोबतच शासन जोपर्यंत नवीन कर्मचारी भरती यासोबतच जुनी पेन्शन योजना लागू करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं कर्मचारी आपल्या मतांवर ठाम आहेत मात्र या उपोषणामुळे विद्यार्थी आणि शेतकरी आपले शैक्षणिक कामासाठी तहसील कार्यालयावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत मात्र कर्मचारी संपावर असल्यामुळे त्याच्या त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे...
वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी ह्या विधान परिषदेच्या निवडणूकीत विजयी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज वाशीमच्या रिसोड शहरातून भावना गवळी यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रिसोड शहरात ठिकठिकाणी भावना गवळी यांचे स्वागत करण्यात आले.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची कागदपत्रे अखेर सापडली आहेत. आज जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना ही कागदपत्रे सादर केली जाणार आहेत. सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची होणार बैठक आहे. जिल्हा शल्य चकित्सक संजय घोगरे यांची माहिती
नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सी.सी.टी.व्ही. कॅमेरा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. कारागृहातील बॅरेक्समध्ये दाखल बंद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 451 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे प्राप्त झालेले असून त्यापैकी 331 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व यंत्रणा आज कार्यान्वित करण्यात आलेय. सिसीटीव्ही यंत्रणा एआय शी जोडली असल्याने संशयास्पद हालचाल झाल्यास त्याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळणार असल्याने तळोजा कारागृह आता अत्याधुनिक झाले असल्याची प्रतिक्रिया अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केलेय.
धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करुन प्रमाणपञ देण्यात यावे या मागणीसाठी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. धनगर समाजातील चार युवक आमरण उपोषणाला बसले असुन जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची बदली वाशीम जिल्ह्यात झाल्यानंतर आता या नियुक्तीवर वाशिम जिल्ह्यातून विरोध सुरू झाला असून वाशिम जिल्ह्यातून त्याची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी वाशिमच्या जिल्हाधिकारी यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे..
मुंबई उपनगरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे नागरिक व वाहनांना पूर्व पश्चिम जाण्यास बंदी घातली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करा असे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे.
दूध हंडी फोडून दूध उत्पादकांनी केला सरकारचा निषेध..
दूध दरासाठी अहमदनगरमधील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ गावात सुरू धरणे आंदोलन सुरू आहे. धरणे आंदोलनाच्या दहाव्या दिवशी दूध उत्पादकांनी स्वतःला दुग्धाभिषेक घातला. तसेच दुधाच्या कॅनसह दूध हंडी उभारत फावड्याने दूध हंडी फोडली. यावेळी सरकारने 40 रुपये भाव न दिल्यास पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला.
स्वामी अविमुक्तेश्वरानं शंकराचार्य उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर आक्षेप घेतला होता... प्राणप्रतिष्ठा सोहळा शास्त्रानुसार होत नसल्याचं शंकराचार्यांचे म्हणणं होतं ... यावेळी शंकराचार्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. दुसरीकडे राहुल गांधी यांनी हिंदुत्व आणि हिंसा यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संसदेत भाषण करताना जो मुद्दा उपस्थित केला होता त्याला सुद्धा अविमुक्तेश्वरानंद यांनी समर्थन दर्शवलं होतं.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. ओमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांच्या घटस्फोट संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. ओमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला दोघेही विभक्त होऊ शकत नाहीत असे निर्देश दिल्ली हायकोर्टानं दिले होते. दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात ओमर अब्दुल्ला यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सुप्रीम कोर्टानं याचिकेची दाखल घेत सुनावणी सुरू केली.
विक्रम मिस्री यांनी आज परराष्ट्र सचिव पदाचा स्विकारला पदभार
परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांच्या निवृत्ती नंतर विक्रम मिस्री यांच्याकडे परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विक्रम मिस्री यांनी आज परराष्ट्र सचिव पदाचा पदभार स्विकारला. विक्रम मिस्री यांनी चीनचे राजदूत म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव म्हणून देखील मिस्त्री यांनी काम केल आहे.
चीन सोबत भारताचे संबंध ताणलेले असताना विक्रम मिस्री यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जातेय
IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी आणखी एका अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं उघड झालंय. पुण्यातील औंध येथील शासकीय रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. लोकोमोटर डीसॅबीलीटी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हा अर्ज केला होता. आधीची दोन अपंगत्व प्रमाणपत्र असताना तिसऱ्या प्रमाणपत्रासाठी का अर्ज केला होता, असा मुद्दा पुढं आलाय.
मरीन ड्राईव्हवर समुद्रात बुडून तरुणीचा मृत्यू झालाय. पोलिसांनी मृतदेह जी टी हॉस्पिटलला पाठवलाय. तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विशाळगड परिसरात तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यावर पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक दाखल झालेय. मनोरमा खेडकर यांचा बंगला पुण्यातील बाणेर रोडलगत आहे. खेडकर यांच्यावर शेतकऱ्यांना धमकवल्या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु पोलिसांनी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा पोलिसांना कुठल्याही प्रतिसाद मिळालेला नाही.
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शेगाव तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली, मात्र इतर तालुक्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तब्बल सहा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर रात्रीपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू झाली. परंतु दमदार पाऊस होत नसल्याने सर्वच प्रकल्पातील जलसाठा अजूनही वाढलेला नाही. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात पुन्हा मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, त्यामुळे आता जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत.
अकोला शहरात 'हिट अँड रन'ची घटना घडली आहे. हा अपघात अकोल्यातल्या रेल्वे स्टेशन आणि सिंधी कॅम्प उड्डाण पुलावर घडलाय. पती-पत्नी दुचाकीनं उड्डाण पुलावरुन जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञाताने कारनं त्यांना उडवलं.
शरद पवार आणि छगन भुजबळ भेटत आहे. महाराष्ट्रात सामाजिक घडामोडी होत आहे, त्याला अनुसरून ही भेट असू शकते, आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतः भेट का होती हे स्पष्ट करतील, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचं आणखी एक गौडबंगाल उघड समोर आलंय. नावात गडबड करून यूपीएससीला गंडवल्याचा आरोप केला जातोय. पूजा खेडकर यांचे यूपीएससी चे अटेम्प्ट / प्रयन्त संपले असतानाही, नावात बदल करून दिली पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप केला जात आहे.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 145.18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा खेड तालुक्यात पडला असून खेडमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 231.42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तर गेल्या 24 तासांत मंडणगड, दापोली, चिपळूणमध्ये देखील 150 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांमध्ये देखील 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था
विविध स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना सोडणार एसटी बसच्या माध्यमातून सोडलं जाणार
रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरती शेकडो प्रवासी एसटी बसच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी स्टेशन वरून 25 बस सोडल्या जाणार
एसटीच्या बसेसने अडकलेल्या प्रवाशांना थेट मुंबईत सोडलं जाणार
सध्या सर्वत्र मोहरम सुरू आहे.या मोहरमच्या सवारीत अनेक अंधश्रद्धच्या प्रथा पाळल्या जातात.असाच काहीसा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे घडला आहे. सरसम येथे सध्या मोहरम निमित्त रात्री गावातून सवारी काढण्यात येत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भाविक वेगवेगळ्या अंधश्रद्धच्या प्रथा पाळतात.
रविवारी रात्री सरसम येथील भाविक चक्क निखाऱ्यावर नाचत होते.अनेक वर्षांपासून हा प्रकार याठिकाणी सुरू आहे. या निखाऱ्यावर नाचताना अनेकांना ईजा देखील होत असते. परंतु अंधश्रद्धा च्या नावाखाली हे भाविक ईजा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात.
सध्या मुंबईसह उपनगरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा तब्बल अर्धा तास उशिराने सुरू आहे. यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. चाकरमानी वर्गांचे मोठे हाल होत आहेत.
तब्बल १५ तासांसापासून कोकण रेल्वे ठप्प असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त करत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ घातला. आमचे तिकीटाचे पैसे परत करा, असं म्हणत प्रवाशांनी थेट तिकीट काउंटरला घेराव घातला. हा प्रकार कळताच पोलिसांनी तातडीने स्थानकाच्या दिशेने धाव घेतली. गाड्या रद्द झाल्याने आता कोकण रेल्वे एसटीने प्रवाशांची व्यवस्था करणार
कायदा सुव्यवस्था तोडू नका बस मध्ये चढताना चेंगराचेंगरी करू नका, असं आवाहन पोलिसांनी प्रवाशांना केलं आहे. 15 तासांपासून रेल्वे स्टेशनवरती या दोन्ही गाड्या केल्यानं मुंबईत परत कसं जायचं याची चाकरमान्यांसमोर मोठी समस्या
हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे, खानापूर ते इसापूर रस्ता पूर्ण पने उखडून गेला आहे, या परिसरातील 15 गावातील दररोज हजारो वाहनचालक या रस्त्यावरून वाहतूक करतात वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याची चाळण झाली आहे.
दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांचे दररोज अपघात होत आहेत तर शेतकरी महिलांना रस्त्यावरून चालने देखील कठीण होऊन बसले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नालवाडा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील नाले तुडुंब भरून वाहताहेत. रस्त्यावरील फुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहन चालकांची तारांबळ होते. पुराच्या पाण्यातून नागरिकांना वाहने काढावी लागताहेत. अनेक शेती पाण्याखाली आल्या आहेत. यात शेतकऱ्याचा मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वे 13 तासानंतर देखील ठप्पच. कोकण रेल्वेच्या सात गाड्या रद्द, तर पाच गाड्या वेगळ्या मार्गाने वळवल्या. पुणे एर्नाकुलम, नेत्रावती एक्स्रप्रेस, गांधीधाम एक्सप्रेस, निझामुद्दीन एर्नाकुलम एक्स्प्रेस, उधाना एक्स्प्रेस अशा गाड्यांचा समावेश. ट्रॅकवरील माती आणि चिखल दूर करण्यासाठी पाऊस ठरतोय अडथळा
पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह नडला, अंजनेरीवर अडकलेल्या 10 पर्यटक अडकून पडले होते. मुसळधार पावसामुळे अंजनेरी गडावरील पायऱ्यांवरून वेगानं पाण्याचे लोंढे वाहू लागल्याने पर्यटकांची घाबरगुंडी उडाली होती. या पर्यटकांची वनविभागाने सुटका केली आहे. तब्बल ६ तासांच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाने अंजनेरीवरून पर्यटकांना सुखरूप उतरवलं आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सर्व पर्यटकांना सुखरूप अंजनेरीवरून खाली आणत केली पर्यटकांची सुटका केली आहे.- पर्यटकांनी अतिउत्साह दाखवू नये, वनविभागाच्या नियमांचं पालन करण्याचं वनविभागाचा आवाहन. तर पावसाळी पर्यटनादरम्यान त्र्यंबकेश्वर परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 26 पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई, 23 हजारांचा दंडही केला वसूल
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जुलै महिन्यात पहिल्यांदाच मोठा पाऊस झाल्याने शेतीपिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. आता पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे.
लोणावळ्यात काही दिवसापूर्वी धबधब्याच्या पाण्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रशासन खडबडून जागा झाला आहे. अशाच प्रकारे धोकादायक पर्यटन करणाऱ्या 12 जणांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक पर्यटन स्थळी जाण्याच्या संदर्भात बंदीचा आदेश लागू केला होता.
हा आदेश झुगारल्याचा ठपका ठेवत 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळ्यातील सहारा पुलाच्या समोरील डोंगरावर असलेल्या धबधबाच्या मागील बाजूस धोकादायकपणे डोंगरात फिरणाऱ्या 7 पर्यटकांवर तसेच टायगर पॉईंट वर हुल्लडबाजी करणाऱ्या 5 असे एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवारपासून लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस व वन विभाग यांची संयुक्त कारवाई गस्त घालत असताना या 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.