मराठीवरुन पेटलेला आंदोलनाचा भडका आता मनसे नेते संदीप देशपांडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत गेलाय. मात्र हे प्रकरण काय आहे? राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा मराठीचा राग आळवला. आणि त्याचे पडसाद कसे उमटले.
मनसेच्या मुंबई शहराध्यक्ष संदिप देशपांडेंना थेट घरात घूसुन मारण्याची धमकी देणारा कॉल आला. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतिय अशा संघर्षाला सुरुवात झालीये. त्याला कारण नेमकं काय ठरलं ते पाहुयात. राज ठाकरेंनी थेट इशारा दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी गया तेल लगाने म्हणणाऱ्या सुरक्षारक्षकाला कान फटवलं.

परंतू घरात घूसुन मारण्याची धमकी दिल्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतियांचा हा मुद्दा चिघळल्याचं दिसतंय. पोलिसांनी या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय. याप्रकरणी आरोपींवर कारवाई होईल परंतू मराठी विरुद्ध परप्रांतिय या वादाचं लोन निवडणूकांपर्यंत कुठे जातं यावर उभ्या राज्याचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.