मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटला? मराठीचा सन्मान असेल तर भेंडी बाजारात जा

Marathi vs Marwari: कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठी आणि मारवाडी असा वाद पेटलाय.. जैन मुनींनी थेट ठाकरेंबंधूंवर विखारी टीका करत, कबुतरखान्यासाठी नवी रणनीती आखलीय... जैन समाज कबुतरखाने सुरु करण्यासाठी आता नेमकं काय करणार?
Jain monk Nileshchandra Vijay addressing the media as tensions rise over the Kabutarkhana issue and the Marathi–Marwari dispute in Mumbai.
Jain monk Nileshchandra Vijay addressing the media as tensions rise over the Kabutarkhana issue and the Marathi–Marwari dispute in Mumbai.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुकीत कबुतरखान्याचा मुद्दा कळीचा विषय ठरणार असल्याचं चित्र मुंबईत निर्माण झालयं...आणि त्याला कारण ठरलंय.. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी ठाकरे बंधूंविरोधात केलेलं वादग्रस्त विधान...जैन मुनी नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका...दरम्यान कबुतरखान्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या जैन मुनीनी मराठी विरुद्ध मारवाडी या वादात उडी घेतल्यानं ठाकरेसेनाही आक्रमक झालीय...

दुसरीकडे कबुतरखाना बंद केल्यानं कबुतरांची काय अवस्था झालीय.. हे दाखवण्याचा प्रयत्नही जैन मुनी निलेशचंद्र यांनी पत्रकार परिषदेत केला.. तर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींनी नवी रणनीती आखतं, जैन समाजाला हाक दिलीय...

कबुतरखान्यासाठी जैन मुनींची रणनीती

जैन समाजाच्या इमारतींमध्ये जाऊन कबुतरांच्या मुद्द्यावर जनजागृती करणार

प्रत्येक वॉर्डात गोरक्षकप्रमाणे कबुतर रक्षक तयार करणार

भुतदयेसाठी तडजोड करणार नाही

कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून याआधीही मराठी विरुद्ध मारवाडी असा वाद रंगला होता... मराठी एकीकरण समिती आणि आम्ही गिरगावकर संघटनेनं प्रत्येक वॉर्डात कबुतरखाने उभारण्याच्या जैन समाजाच्या भूमिकेला विरोध करत...मारवाड राजस्थानला जाण्याचा खोचक सल्ला दिला होता...त्यात जैन मुनी निलेशचंद्रांनी शांतिदूत जन कल्याण पार्टीची घोषणा करून महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. मराठी-अमराठीच्या वादात आता कबुतराचा मुद्दा किती प्रभावी ठरणार हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com