शिव छत्रपतींच्या महाराष्ट्रात सध्या मराठी माणसांचे हाल सुरुयेत असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. मिराभाईंदरमध्ये मराठी माणसांच्या अपमानाच्या घटना काही कमी होत नाही. गुजराती भाषेतील पाट्या, मराठी बोलण्यास नकार या घटना घडत असतांना आता मराठी माणसाला घर नाकारुन उच्चशिक्षित बिल्डरनं आपल्या सडक्या जातीव्यवस्थेची पकड अजून घट्ट असल्याचं दाखवून दिलंय. नेमकं काय घडलंय पाहा,
भाईंदर पश्चिमेतील श्री स्कायलाईन बिल्डरचं अनोखं फर्मान
मासांहारी लोकांना घर विकण्यास मनाई
जैन आणि ब्राम्हणांनाच देणार 600 घरं
केवळ शाकाहारी लोकांसाठीच गृहप्रकल्प
रविंद्र खरात नावाचा मराठी माणूस या प्रकल्पात घर खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर तिथल्या मॅनेजरनं मराठी माणसाला आणि मासांहार करणाऱ्यांना घर देत नाही असं ठणकावून सांगितलं. विश्वास बसत नसेल तर व्हीडीओ नीट पाहा
या धक्कादायक प्रकारानंतर घर खरेदीसाठी गेलेल्या या मराठी माणसानं संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केलीये. महाराष्ट्रात मराठी माणसाला थातुरमातूर कारणं देऊन घर नाकारण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. या आधी मुलुंड आणि घाटकोपरच्या जैनबहुल भागात असे प्रकार समोर आले होते. घडल्या प्रकारानं संतप्त होत उद्धव ठाकरेंनी या लोकांना तडीपार करण्याची मागणी केलीये.
महाराष्ट्रात मराठी भाषेवर आणि मराठी माणसांवर होणारे हे हल्ले पाहून सुरेश भटांच्या कवितेतील आपल्या घरात हाल सोसते मराठी हा अंतरा नक्कीच आठवतो. पण आता पुरे.. किती दिवस हा अपमान मराठी माणसानं सहन करावा? जाती व्यवस्थेविरोधात अखंड आयुष्य लढा देणाऱ्या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनीचं मराठी माणसाला घर नाकारून जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या या बड्या धेंड्यांना आता धडा शिकवायला हवा. राज्यसरकारनं अशा लोकांना अद्दल घडवायला हवी.. शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असा माजोरडेपणा चालणार नाही, हे ठासून सांगण्याची वेळ आता आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.