कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय. या दोन्ही स्टेशनदरम्यान वायरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय.
हिंगोलीत वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्याचा कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, दत्तात्रेय कोळपे असे या मृत झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे दरम्यान वरिष्ठांच्या दबावामुळे ताण-तणाव येऊन मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कार्यवाही करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादामध्ये भेसळ केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने भेसळीचा तपास काही दिवसांसाठी थांबवला आहे.P
ठाण्यातील कळवा परिसरातील सह्याद्री शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार दुपारी घडला होता.इयत्ता 5 वी आणि सहवी मधील विद्यार्थी आहेत.40 हून अधिक विद्यार्थ्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.50 हून अधिक मुलांना विषबाधा झालीं होती.त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे
एकाच महिन्यात ४६ लाख १९ हजार १३० प्रवाशांनी केला पुणे मेट्रोने प्रवास केला. सप्टेंबर महिन्यात ४६ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येची विक्रमी नोंद झाली. पुणे मेट्रोची दैनिक सरासरी प्रवासी संख्या १ लाख ५३ हजार ९७१ वर पोहचली.
माजी मंत्री आणि भाजपचे नेते पद्माकर वडवी यांचा अखेर भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिला.
धनगर आरक्षण संदर्भात भूमिकांना पटल्याने भाजपला ठोकला राम राम
आदिवासी समाजासाठी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सोडला पक्ष
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली होती टीका
मयूर नायडू असे १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज सकाळी १ ते २ वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सध्या खडकवासला धरणाजवळ असलेल्या पाण्यात अनेकजण कपडे धुण्यासाठी जात आहेत. आज दुपारी नायडू हा त्या ठिकाणी गेला होता. तिथेच जवळ असलेल्या डबक्यात तो उतरला मात्र अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. बचाव कार्यासाठी अनेक पथकं त्याठिकाणी दाखल झाली होती, मात्र काही वेळाने त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी भाजपच्या शहर अध्यक्षांनी घेतली उडी घेतली आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहराचे भाजप चे शहरअध्यक्ष धीरज घाटे कसब्यातून इच्छुक असून घाटे यांच्या समर्थांकडून सोशल मीडियावर आमदारकीच्या पोस्ट करण्यात येत आहेत.कसबा विधानसभा मधून हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्यापैकी कोणाला मिळणार उमेदवारी, याची चर्चा सध्या सुरू आहे.
उमरगा शहरात महत्त्वाच्या चौका चौकात बॅनर लावून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिकात्मक फोटो बॅनरवर लावत महाराष्ट्रातील बेपत्ता महिलांविषयी प्रश्न विचारण्यात आलाय.महाराष्ट्रात एका वर्षात बेपत्ता झालेल्या 64 हजार महिला कुठे आहेत असे या बँनरवरती लिहीण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यात यावे या मागणीसाठी आक्रमक होत यवतमाळच्या कळंब येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बैलबंडीतून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून निघत तहसील कार्यालयात धडकला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, पिकविम्याचा लाभ देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली मतदान प्रक्रिया पूर्ण केली. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला मध्ये विद्यमान आमदारांनाच पसंती मिळालीय. बहुचर्चित कसबा विधानसभा मध्ये हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्यातून एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
जायकवाडीचे पाणी सिंदफणा नदी पात्रात आणण्याची योजना राबवा या मागणीसाठी बीडच्या हिरापूर गावात सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी तब्बल दीड तास रस्ता अडवला यामुळे वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आले. बीड जिल्ह्यातील 140 गावचा कायमस्वरूपी दुष्काळ नाहीसा करण्यासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाईपलाईन द्वारे सिंदफना नदी पात्रात पाणी सोडा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात लोक लढा उभारून राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे आगामी कालावधीमध्ये जायकवाडीचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. यापूर्वीच शरद पवार यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. मंत्रीपदाच्या कुठल्या शर्यतीत नसल्यामुळे त्यावर चर्चा करण्याचा विषयच नाही.रोहित पवाराने मुख्यमंत्री व्हावेत का? यावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
पुणे शहरातील नाले अरुंद आहेत. तेथे अन्य मशिनरी पोहचू शकत नाही. मनुष्यबळाचाही वापर करू शकत नसल्याने स्पायडर मशिनने नाले स्वच्छ केले जाणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत ३ कोटी ५३ लाख ४२ हजार रुपयांच्या पाच निविदांना मंजुरी देण्यात आली. नाल्यांमध्ये अवघड ठिकाणी जेसीबी, पोकलेन पोहोचू शकत नसल्याने तेथे स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे अत्याधुनिक स्पायडर मशीन वापरून नाले साफ केले जातील.
माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांना शरद पवार पक्षात घेण्यास शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. आमदार बबन शिंदे यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज टेंभुर्णी येथे शरद पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार बबन शिंदे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करण्यात आला.
शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मध्ये होणार.
बीकेसीमधल्या मैदानाची झाली निश्चिती.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणारा हा तिसरा दसरा मेळावा.
मेळाव्यासाठी तब्बल 40 हजार शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन.
भंडाऱ्यातील भोजापूर परिसरात एका विद्यार्थ्याला व्हनने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. आदीत्य रूपचंद बागडे (11 वर्षे) हा संत शिवराम शाळेतील तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी भोजापूर परिसरातून शाळेत चाललेला होता. दरम्यान रॉयल पब्लिक स्कूलच्या भरधाव प्रायव्हेट व्हॅनने त्याला चिरडले. या अपघातानंतर व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलकांकडून निषेध आंदोलन.
लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा टायर पेटवून निषेध.
आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्या येत आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्यावर आंदोलकांनी रस्त्यावर काट्या अथरून निषेध केला.
मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या कसारा घाटत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. आज सकाळी जुन्या कसारा घाटत कंटेनराला अपघात झाला होता. या कंटेनरला मागून पुन्हा दोन वाहने धडकल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
मनमाड शहरात पोलीस स्टेशनजवळच अपघात झालाय. कॅटेनरच्या चाका खाली सापडून ऐका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.
मला सांगा पीएम किसान आणि नमो किसान योजनेचे 6 + 6 हजार कुणाला मिळतात
- वीज बिल आता कुणाला येणार नाही
- तुम्हा सर्वांना बिल येत होतं की नाही
- आता मागचं भरायचं नाही अन पुढचं द्यायचं नाही , अशी योजना दादांनी आणली
- मागच्या वर्षी कापूस अन सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून आपल्या दादांनी कापूस अन सोयाबीनला हेक्टरी 5 हजार रुपये देणे सुरू आहे
- मी जबाबदारीने सांगतो येत्या 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पडेल
- याचा अर्थ एकच आहे, शेतकरी देखील आमचा लाडका आहे
- त्यामुळं आता तुम्हाला विनंती आहे, दादांच्या पाठीमागे उभे राहा
- जर दिलेल्या योजना कायम ठेवायच्या असतील तर सत्तेमध्ये दादा आवश्यक आहेत
Mumbai Metro News : नवरात्रीच्या काळात उशीरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर पर्यंत आपल्या मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. स्वत: संभाजीराजेंनी X अकाऊंटवरून पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकींकरिता “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले असल्याची माहिती देखील छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली.
दुष्काळी बीड जिल्ह्यावर यंदा वरुण राजाने कृपा केल्याने शेतकऱ्यांसह नागरिक पाणी संकटातून बाहेर पडले आहेत. बीड जिल्ह्यातील लाभक्षेत्रात असलेल्या 143 लहान-मोठ्या धरणांपैकी 95 प्रकल्प पूर्णतः भरले असून, उपयुक्त पाणीसाठा 79.21 टक्के झाला आहे.
आज मंगळवारी सकाळी लातूरच्या जळकोट येथे विविध प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं . यावेळी प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी अधिकाऱ्याला एक चूक लक्षात आणून देत, थेट अधिकाऱ्याची कान उघडनी केली आहे. इमारती मध्ये करण्यात आलेल्या छताला सिलीग केली नाही म्हणत, अजीत पवारांनी अधिकाऱ्याची कान उघडणी केली.
पुणे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. हवामानातील अनुकूल घडामोडीमुळे पुण्यात चारही महिने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने हंगामामध्ये 1हजार 133 मिलिमीटर पावसाची नोंद झाली . हंगामातील पावसाची सरासरी जवळपास दुप्पट यंदा नोंदवला गेला आहे. घाटमाथा,जिल्हा आणि धरण क्षेत्रात ही समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली.
जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्लॅब कोसळला. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील राजवाडी येथे ही घटना घडली. या गावात अंगणवाडी साठी वर्ग खोली नसल्याने या प्राथमिक शाळेत अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना बसवण्यात येत होते.अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी या शाळेच्या खोलीत असताना अचानक शाळेचा स्लॅब कोसळला. सुदैवाने यात विध्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. परंतु या घटनेत अंगणवाडी सेविका मात्र किरकोळ जखमी झाली.
पालघर मनोर रस्त्यावरील मासवण सूर्या नदीच्या पुलावर भरधाव इनोवा कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मनोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला मनोर ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.