Marathi Language: बँक, रेल्वे अन् सरकारी ऑफिसमध्ये मराठी अनिवार्य; सरकारचे आदेश

Government Decision Of Marathi Language Mandatory: आता रेल्वे, बँकांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला कार्यालयांमध्ये मराठी भाषा बोलणे अनिवार्य आहे.
Marathi Language
Marathi LanguageSaam Tv
Published On

मराठी भाषेसंदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे, बँकांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. केंद्रिय कार्यालयांमध्ये या आदेशाची काटेकोरपणे अंबलबजावणी करण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्रातील केंद्राची सर्व कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वेमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. इंग्रजी, हिंदीसोबतच मराठी भाषा वापरली जाणार आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंबलबजावणीदेखील करण्यास सांगितले आहे.

Marathi Language
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बेसिक पेन्शन ७५०० रुपये होणार?

मराठीचा वापर करण्यास टाळाटाळा करणाऱ्यांना ऑफिसच्या प्रमुखांना समज देण्याची सूचनाही केली आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत बोलवून त्यांना या सूचना मराठी भाषा विभागाने दिल्या आहेत.

मराठी भाषेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद होताना दिसत आहे. अनेकजण महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्यास नकार देत आहे. याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. त्यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसेने बँकांना निर्वाणीचा इशारा दिला होता.

गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याने कानडी भाषेत बोलण्यास नकार दिला होता. त्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्‍यांनीच केली. त्यांनी या कर्मचाऱ्याची बदली राज्याबाहेर केली. त्यानंतर पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान यामध्ये राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आबे.ं

Marathi Language
Mumbai APMC Market : मुंबई एपीएमसीत तीन दिवसापासून भाजीपाला पडून; मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी, व्यापारी अडचणीत

मराठी भाषा विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व क्रेंदिय कार्यालयात मराठी भाषा सक्तीची अंबलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता बँका, केंद्र सरकारचे कार्यालये, बँका विमा कंपन्यांमध्ये तुम्हाला मराठीमध्ये बोलावे लागणार आहे.त्यामुळे आता कार्यालयांमध्ये त्रिभाषा हे धोरण अवलंबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Marathi Language
Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरू; आजच करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com