विनाेज जिरे / सचिन कदम / भारत नागणे
मनाेज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या मागणीनूसार मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) द्यावे अशी मागणी आज (मंगळवार) बीड जिल्ह्यात सकल मराठा समाजाने केली आहे. सध्या आरक्षण प्रश्नावरून समाजाची फसवणूक केली जात असल्याची भावना आंदाेलकांनी व्यक्त केली. दरम्यान सांगाेला आणि रायगड येथे मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे आभार मानत फटाके फाेडून मिठाई वाटण्यात आली. (Maharashtra News)
मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारने समाजाची दिशाभूल केली आहे असे म्हणत मराठा तरुणांनी परळी ते बीड असा पायी मोर्चा काढला. हा माेर्चा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल झाल्यानंतर युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार समाजाला सरसकट कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी आंदाेलक युवकांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युवकांनी प्रशासनास दिला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सांगोल्यात जल्लोष
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा विधीमंडळात निर्णय झाल्यानंतर या निर्णयाचे सांगोल्यात जोरदार स्वागत करण्यात आले. येथील मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या समर्थकांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
रायगडमध्ये जल्लोष
मराठा आरक्षणाचा मार्ग माेकळा झाल्याने आज रायगड येथे शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयजयकार करत फटाके फोडले. त्याच बरोबर पेढे वाटत मराठा बांधवांनी आणि शिवसैनिकांनी रायगडमध्ये जल्लोष साजरा केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.