Manoj Jarange Patil : काय व्हायचं, ते होऊ द्या, ओबीसीतूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil Jalna Sabha : काय व्हायचं, ते होऊ द्या, ओबीसीतूनच आरक्षण घेणार : मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam Tv
Published On

Manoj Jarange Patil Jalna Sabha :

''ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आरक्षण सरकार कसं देत नाही ते मराठा समाज बघणार आहे. आम्ही दंड आणि मांड्या दोन्ही थोपटल्या आहेत, काय व्हायचं आहे, होऊ दे'', असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. जालना येथे झालेल्या सभेत ते असं म्हणाले आहेत.

'तर, गाठ मराठ्यांशी आहे'

ते म्हणाले आहेत की, ''दबावामुळे मराठ्यांचे आरक्षण मिळाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती आहे, याच्या दबावात येऊन तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर, गाठ मराठ्यांशी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
UN Climate Summit: भारतात आयोजित होणार UN क्लायमेट समिट 2028? COP28 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी ठेवला प्रस्ताव

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''जर 24 डिसेंबरला तुम्ही (राज्य सरकार) दगा फटका केला तर 24 डिसेंबर आम्ही दाखवून देऊ आंदोलन काय असतं. सरकार यांना (भुजबळ) सोबत कसं काय घेऊन फिरतंय? मग सरकारनेचं यांना सांगितलं का जाती काढायला? पुढील 2 दिवसात अंतरवलीचे गुन्हे आणि एक महिन्यात महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्या, असंही ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

ते म्हणाले, तुम्ही आमच्याशी दगाफटका करू नका. तुम्ही स्थानिक पोलिसांकडून आमच्यावर हल्ला करून आणला. जरांगे म्हणाले, ''आम्ही शांततेत बसलो होतो. तुम्ही अचानक हल्ला केला, आमच्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आमच्या आई बहिणींवर हल्ला झाला. इतकं निष्ठुर सरकार आणि प्रशासन पहिल्यांदा पाहिलं. तुम्ही गुन्हे मागे घेता म्हणता आणि अटक करता. असा दगाफटका करू नका.''

Manoj Jarange Patil
NCP News : बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही; अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर आव्हाडांचा हल्लाबोल

लातूरला 144 लावायचे कारण काय?

जरांगे पुढे म्हणाले, लातूरला 144 लावायचे कारण काय? मुख्यमंत्री शिंदे तुम्ही समाजाच्या रोषाला सामोरे जाऊ नका. 24 डिसेंबरपर्यत आपली कसोटी आहे. काहीही झालं तरी उग्र आंदोलन करायचं नाही. ते (भुजबळ) दंगली भडकवण्याचे प्रयत्न करतोय. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसगट आंदोलन मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com