
मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर संताप.
विरोधकांना संपवायचं असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.
ओबीसी नेत्यांच्या भूमिकेमुळे मराठा समाज आक्रमक झालाय.
मराठ्यांवर जळणारे एवढे लोक का आहेत? बैठकीमुळे ते उघडे का पडले. आपला खरा शत्रू कोण हे कळालं. आता चिंता करायची नाही विरोध करणारा संपवायचा एवढा मराठ्यांनी लक्षात घ्यावं,असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना दिलाय. मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासकीय निर्णय करण्यात यावा.
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊन यासाठी ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेत आहेत. ओबीसी नेत्यांची मागणी ऐकून घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील संतप्त प्रतिक्रिया दिलीय. मराठ्यांवर जळणारे एवढे लोक का आहेत. बैठकीवरून यामुळे ते उघडे पडले, आपला खरा शत्रू कोण हे कळालं.
आता परिणामाची चिंता करायची नाही, विरोध करणारा संपवायचा एवढा मराठ्यांनी लक्षात घ्यावं. मराठ्यांनी मराठ्यांच्या लेकरांबाबत जी अडचण आहे, दूर करायच्या कामाला लागायचं, असा सूचना त्यांनी माध्यमांशी बोलताना केल्यात. कळवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायच, जो विरोध करेल त्याला राजकीय संपवायचं. एखाद्याच बोगस आरक्षण खाऊन खाऊन रक्त पण बोगस झालेलं असतं.
मोठे नेते चांगले मराठ्यांना वाटलं ते यांच्यात असेल पण ते नाही. ज्या जातीचा नेता आता अडवा येईल त्याला आता सपवायचं एवढं मराठ्यांनी लक्षात ठेवा. 2 आणि 4 हजारांसाठी यांच्या मागे पळू नका, असंही जरांगे पाटील म्हणाले.
खोटे कुणबी प्रमाणपत्र देणऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यावरून बोलताना जरांगे यांनी बावनकुळे यांची जात काढत आपण त्यांचे भ्रष्टाचारबाहेर काढू. बावनकुळे हे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या मागे लागलेत. त्यांना काही दिल तर ठीक नाही तर हे कारवाई करतो. बावनकुळे यांना त्यांची जात आरक्षणात केव्हा आली हे माहिती नाहीये. खोटे प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तर सर्वात अगोदर तेच आरक्षणातून बाहेर पडतील असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.