Maratha vs Kunbi Maratha: मराठा विरुद्ध कुणबी मराठा, जरांगेंविरोधात ओबीसींनी शड्डू ठोकला

Growing Conflict: मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण नको, अशी मागणी कुणबी मराठा समाजाने केलीय.. मात्र कुणबी समाजाने ही मागणी का केलीय? आणि यामुळे राज्यात मराठा विरुद्ध कुणबी मराठा वाद पेटण्याची शक्यता कशी आहे?
OBC Federation protest in Nagpur against Maratha reservation demand; Kunbi community says no to giving Kunbi certificates to Marathas.
OBC Federation protest in Nagpur against Maratha reservation demand; Kunbi community says no to giving Kunbi certificates to Marathas.Saam Tv
Published On

मुंबईत मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा जनसागर उसळलाय.. मात्र राज्यात मराठा विरुद्ध कुणबी मराठा असा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झालीय.. कारण कुणबी मराठा समाजाने मराठा समाजाविरोधात दंड थोपटलेत... मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नयेत, अशीच थेट मागणी कुणबी समाजाने केलीय...

खरंतर मुंबईत मनोज जरांगेंनी कुणबी आणि मराठा एकच आहेत, असं म्हणत ओबीसीतून आरक्षणाची मागणी केलीय.. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलंय.. त्याविरोधात नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरु केलंय.. त्यात कुणबी समाजानेही उडी घेत मराठा समाजाचं कुणबीकरण रोखण्याची मागणी केलीय..

ओबीसींच्या साखळी उपोषणात काँग्रेसचे गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान, शिक्षक आमदार सुधाकर आडबाले, माजी आमदार अशोक धावड, भाजप आमदार परिणय फुके आणि आशिष देशमुखांनी या आंदोलनाला समर्थन दिलंय..मात्र ओबीसींमधील भीती दूर करण्यासाठी सरकारने शब्द देण्याची मागणी बबनराव तायवाडेंनी केलीय...

राज्यातील सुमारे १ कोटी मराठा समाज कुणबीत आल्यास कुणबी समाजाची संधी कमी होईल अशी भिती व्यक्त करण्यात येतेय . खरंतर 13 ऑक्टोबर 1967 पासून कुणबी समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात आलंय.. मात्र आता जरांगेंनी कुणबी आणि मराठा एकच असल्याचा दावा केलाय..

मात्र याच दाव्याला विरोध करत ओबीसी आंदोलनात कुणबी समाजाने सहभाग घेतला .... त्यामुळे कुणबी मराठा विरूद्ध मराठा असं चित्र निर्माण झालंय ... यातुन ओबीसी महासंधानं जरांगेंच्या मागणीला आव्हान दिलंय.. विरोध करणा-या विदर्भातील कुणबी समाजाच्या मागण्या काय आहेत?

- मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या चौकटीत आरक्षण देऊ नये

- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रही देऊ नये

-मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची सरकारने लेखी हमी द्यावी

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना आता मराठा समाजातीलच एक घटक असलेल्या कुणबी मराठा समाजानेच जरांगेंना आव्हान दिल्याने राज्यात मराठा विरुद्ध कुणबी मराठा असाच वाद पेटण्याची शक्यता आहे..यातुन जाती जातीतील तणाव वाढीला लागणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com