Maratha Reservation Update: मराठा नेत्यांना पदे, पैशांचं आमिष; मनोज जरांगेंकडून कानउघडणी

Maratha Reservation Update: मराठा समाजातील काही अतृप्त नेत्यांना सरकारने हाताशी धरलं असून पदे आणि पैशांचं आमिष दाखवून आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप
Maratha Reservation Update
Maratha Reservation UpdateSaam Digital
Published On

Maratha Reservation Update

मराठा समाजासाठी काही महिन्यांपासून आंदोलन पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणि मराठा समाजाला चांगलंच सुनावलं आहे. मराठा समाजातील काही अतृप्त नेत्यांना सरकारने हाताशी धरलं असून पदे आणि पैशांचं आमिष दाखवून आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून वेगळं आंदोलन करणाऱ्या मराठा नेत्यांची कानउघडणी केली आहे. मराठा नेत्यांच्या मागावर असलेल्या मंत्र्यांचं नाव दोन दिवसांत उघड करणार असल्यांचही जरांगे म्हणाले आहेत.

सरकारनं माझ्यावर ट्रॅप लाऊन मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मला नेता बनायचं नाही. वाटलं तर मी हिमालयात जाऊन बसेन. मी विकला जात नाही हेच सरकारचं दुखणं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकारचा मसुदा जोपर्यंत पाहत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या विधानानंतर दिली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation Update
Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची सरकारला धास्ती; मुंबईत धडकण्याआधीच आरक्षणावर तोडगा निघणार?

मी मेलो तरी माझ्या अंत्यविधीला येऊ नका पण माझे विचार मरू देऊ नका. राज्यातले सत्ताधारी, विरोधकही आमच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत, मात्र मराठ्यांच्या नादाला लागू नका अन्यथा मराठे तुमचा सुपडासाफ करून टाकतील असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच कायद्याच्या चौकटी हटवून त्यांची चौकशी करा, अशी टीका छगन भुजबळ यांचं नाव न घेता केली आहे.

Maratha Reservation Update
Maharashtra Politics: ब्रेकिंग! महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com