Manoj Jarange Patil: १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा, शांततेच्या मार्गाने आंदोलन... जरांगे पाटलांची पुढची रणनिती ठरली!

Manoj Jarange Patil Press Conference: मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्यात त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणालेत.
Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Manoj Jarange Patil On Maratha ReservationSaam Digital
Published On

Manoj Jarange Patil News:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्च मिळणार आहे.

त्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या केल्यात त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणालेत.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अनेक बांधवांनी आत्महत्या केल्यात. त्यांच्या कुटुंबियांची रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर भेट घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच दोन दिवस आराम करुन १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

"मराठा आरक्षणासाठी अनेक बांधवांनी आत्महत्या केल्यात. त्यांचे दुःख मोठे आहे. सर्वत्र दुःखाचे सावट आहे, अशात सण कसा साजरा करु? असे म्हणत यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितले आहे.

Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Maharashtra Politics: मुंब्र्यातील शाखेवरुन हायकोर्टात रंगणार 'सामना'; ठाकरे गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी!

आत्महत्या न करण्याचे आवाहन..

"24 डिसेंबरपर्यंत सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे म्हणत कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. बाकीच्यांनाही मिळतील, त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.." असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Eknath Shinde: काही फुसके बार आले होते, जे न वाजताच निघून गेले...; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com