मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय. येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे. मराठी समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले नाही. सगेसोयरे अध्यादेश आणि त्याची अंमलबजावणीची अजूनही प्रतिक्षा आहे. त्यातच मुंबईत येणारा मराठ्यांचा मोर्चा अडवला तर राज्यासह केंद्रालाही गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जरांगेंनी दिलाय.
27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार, शहागड - पैठण मार्गे शेवगाव - पांढरी पूल -आळेफाटा- शिवनेरी दर्शन -कल्याण,वाशी, चेंबूर या मार्गे मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार... दरम्यान एक मुक्काम शिवनेरी गडावर होण्याची शक्यता आहे
जानेवारी 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचा ड्राफ्ट जरांगेंच्या हाती सोपवला होता. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यावेळी मोर्चाच्या मागण्या काय असणार आहेत?
मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढा
हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा
आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा
मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या वारसांना नोकरी द्या
दरम्यान, राजकीय पक्षांच्या भूमिका, सत्ताधाऱ्यांची उदासीनता, आणि आरक्षणप्रश्नी सुरू असलेला वेळकाढूपणा यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची लाट उसळू लागलीय़. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर सरकार तोडगा काढणार का? की जरांगेंच्या मोर्चानं सत्ताधाऱ्यांची कोंडी होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.