Ashok Chavan: मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघणार? अशोक चव्हाण जरांगे पाटलांशी करणार चर्चा

Ashok Chavan : मराठा आरक्षणांसंदर्भात अशोक चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलंय. नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षणांचा निकाल लावला जाईल, असं चव्हाण म्हणालेत.
Ashok Chavan On Maratha Reservation
Ashok Chavan On Maratha Reservation Saam Tv

Ashok Chavan On Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केलंय. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू झालंय. आचारसंहिता संपेल तेव्हा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला जाईल, असं प्रतिपादन अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलंय.

मराठा आरक्षणाचा निकाल लावण्यात येईल. त्यात जर काही अडचणी असतील तर मनोज जरांगे-पाटीलविषयी चर्चा करून त्या अडचणी दूर केल्या जातील असं अशोक चव्हाण म्हणालेत. नांदेड येथे लोकसभा प्रचारसभेच्या सांगतेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आंदोलन बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी यावेळी केलाय. मराठा आरक्षणातील मुद्दे राहिले ते जरांगे पाटील यांच्यासोबत राहून सोडवण्याचा प्रयत्न करीन, असं चव्हाण म्हणालेत.

लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना अशोक चव्हाण म्हणालेत, दुसऱ्या टप्प्यात वातावरण चांगले आहे. भाजपचे उमेदवार निश्चितच निवडून येतील. नांदेड जिल्हा सकारात्मक जिल्हा आहे. पण विरोधाकडे विकासाचे मुद्दे नाहीत. लोकांना वेगळे मुद्दे उपस्थित करून विरोधकांनी टीका केली. नरसी सभा त्यावेळी पाऊस सुटला. तेव्हा अमित शाह यांनी नांदेडचा मोसम बदल गया है असा उल्लेख केला त्यावर अपप्रचार केला. पंतप्रधान मोदींनी सभा घेतली, त्यावर टीका केल्याचं अशोक चव्हाण म्हणालेत.

दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण मंजूर करण्यात आलंय. राज्यात आरक्षण ६ फेब्रुवारीपासून सुरू झालंय. मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले.

Ashok Chavan On Maratha Reservation
Manoj Jarange Patil : 'मराठा आरक्षण चालत नाही, ओपन मतदारसंघात ओबीसी नेते का उभे करता? जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com