मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. सध्या जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून येत्या २० जानेवारीला ३ कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली.
मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांची संख्या ३ कोटींपेक्षा कमी पडली बदलून ठेवा, असंही जरांगेंनी ठामपणे सांगितलं. मराठा समाजाची मुंबईच्या दिशेने कूच करण्याची वेळ आली असून त्यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत, असंही जरांगे म्हणाले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
१२ जानेवारी निमित्त मनोज जरांगे पाटील यांनी आज जालन्यातील अंतरवाली सराटी गावात राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी शेकडो मराठा बांधव तसेच भगिणींनी एकत्रित येऊन शिवआरती देखील केली. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी परिसरत दणाणून गेला होता. (Latest Marathi News)
दरम्यान, राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले, राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात येतंय, की जरांगे पाटलांना तसेच मराठा समाजाला (Maratha Reservation) मुंबईत येण्याची वेळ पडणार नाही. मात्र, आम्हाला वाटतं मुंबईला निघण्याची वेळ आली आहे.
आमचे मराठा बांधव उर्वरित कामे पूर्ण करत असून लवकरच आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करू, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर येत्या २० जानेवारीला ३ कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार, ही संख्या कमी झाली तर नाव बदलून ठेवा, असंही जरांगेंनी ठामपणे सांगितलं आहे.
मराठा आंदोलक मुंबईत कोणत्या मार्गाने येणार?
२० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आंदोलक निघतील. बीडच्या शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी मार्ग अहमदनगर जिल्ह्यात दाखल होती.
यानंतर पाथर्डी, तीसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव मार्ग मराठा आंदोलक पुण्याला पोहचतील. सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजगणाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे-मुंबई एक्स्प्रेसमार्गे लोणावळा मार्ग नवी मुंबईत दाखल होतील. त्यानंतर वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानावर पोहचतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.